राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल रात्री उशीरापर्यंत शिवसेना खासदारांची (Shivsena MPs) बैठक घेतली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक घेण्यात आली. केंद्र सरकारकडून त्यांना राज्यातील सत्तेत भागीदार म्हणून समान वागणूक दिली जात नसल्याचा मुख्य मुद्दा पुढे आला आहे.
“आम्ही आता भाजपचा एक भाग आहोत, तरीही आम्हाला इतरांच्या बरोबरीने वागवले जात नाही, आम्हाला अधिक निधी आणि समतावादी वागणूक मिळाली पाहिजे” असे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी म्हंटले आहे.
गेल्या जून महिन्यामध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर 13 खासदार शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. निवडणूक आयोगाने अधिकृत पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिल्याने त्यांनी शिवसेनेचे संसदीय कार्यालयही ताब्यात घेतले. आता खासदारांना त्यांच्या जागा भाजपसोबतच्या जागावाटपाच्या व्यवस्थेत कायम राहायच्या आहेत आणि त्यासाठी शिंदे आणि भाजप दोघांकडूनही आश्वासन हवे आहे. निवडणुका आल्या की भाजपने प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उचलावा अशी आमची इच्छा आहे, असे त्यांच्यापैकी काही खासदारांनी बैठकीत सांगितले आहे.
राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही खासदारांनी या बैठकीत चर्चा केली आहे. शिंदेगट यासाठी रणनीती आखत असून, मुंबई आणि ठाण्यातील निवडणुका जिंकणे आणि ठाकरे गटाला मात देणे हे मुख्य ध्येय आहे.
राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तीकर हे मुंबईचे असल्याने ते पक्षाच्या प्रचाराला चालना देणार आहेत. शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाचे नाव अधिकृतरित्या देण्यात आल्याने ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवकांना संभाव्य उमेदवार म्हणून पहात आहे.
काल (बुधवारी), ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले की,' शिंदेंसोबत पहिल्यांदा पक्षांतर करणारे शिवसेनेचे सर्व 13 खासदार पराभूत होतील आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट जिंकेल. त्यावर शिवसेना नेते आणि राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, 'राऊत यांनी लक्षात ठेवावे की, या लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले होते'.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.