पुणे : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याीनंतर सध्या महायुती सरकार धास्तावलेलं आहे. त्यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शिवरायांच्या समाधीवरुन केलेल्या विधानानं वादंग निर्माण झालं आहे. त्यामुळं भाजप पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं असून विरोधीपक्षांकडून टीकाटिप्पण्या केल्या जात आहेत.