Nagpur Crime: मृतदेहाला केमिकल लावण्यासाठी मागितले पैसे; नागपूरध्ये धक्कादायक प्रकार
Nagpur News: शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह दुसऱ्या गावी घेऊन जायचा होता. त्यामुळे त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मृतदेह सुस्थितीत राहण्यासाठी केमिकल लावण्याची विनंती केली. त्यावर शवविच्छेदनगृहातील कर्मचाऱ्यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली.
नागपूरः मृत्यूसारख्या गंभीर प्रकरणातही लाचखोरांची हाव थांबत नसल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघड झाला आहे. मृतदेहाला आंघोळ घालून केमिकल्स लावण्यासाठी पैसे मागितल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत.