Monkeypox : मंकीपॉक्सला घाबरण्याची गरज नाही; फक्त 'ही' 6 लक्षणे आढळल्यास लगेचच घ्या उपचार

Latest Monkeypox News : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
Monkeypox : मंकीपॉक्सला घाबरण्याची गरज नाही; फक्त 'ही' 6 लक्षणे आढळल्यास लगेचच घ्या उपचार
Updated on

Latest Monkeypox Update In India: जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे.

मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मंकीपॉक्सच्या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनेनुसार केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रतिबंध व उपाययोजना राबविण्याबाबतसूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

Monkeypox : मंकीपॉक्सला घाबरण्याची गरज नाही; फक्त 'ही' 6 लक्षणे आढळल्यास लगेचच घ्या उपचार
Monkeypox Virus In Pakistan : पाकिस्तानमध्ये आला मंकीपॉक्स.! पहिला रुग्ण आढळल्याने अलर्ट जारी, भारताची चिंता वाढली

यामध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याचा सामावेश आहे. यानुसार राज्याने याबाबत सर्वेक्षण, प्रतिबंधक मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.(What is monkeypox?)

मंकीपॉक्स हा प्रामुख्याने माणसापासून माणसाला होणारी लागण जसे की, थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपडयांमार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचे संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे, प्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

Monkeypox : मंकीपॉक्सला घाबरण्याची गरज नाही; फक्त 'ही' 6 लक्षणे आढळल्यास लगेचच घ्या उपचार
Monkeypox : चिंता वाढली! ब्रिटनमध्ये आढळला मंकीपॉक्सचा नवा व्हेरियंट

संशयित रुग्णाची लक्षणे –

• शरीरावर अचानक पुरळ उठणे

• सुजलेल्या लसिका ग्रंथी

• ताप

• डोकेदुखी

• अंगदुखी

• प्रचंड थकवा

• घसा खवखवणे आणि खोकला

मंकीपॉक्स न होण्यासाठी अशी घ्या काळजी

• संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे.

• रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरुणा पांघरुणाची संपर्क येऊ न देणे.

• हातांची स्वच्छता ठेवणे.

• आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे.

* नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या सूचनांचे पालन करणे.

(Symptoms of a suspected monkeypox patient)

Monkeypox : मंकीपॉक्सला घाबरण्याची गरज नाही; फक्त 'ही' 6 लक्षणे आढळल्यास लगेचच घ्या उपचार
Monkeypox : वाढता धोका लक्षात घेता न्यूयॉर्कमध्ये आरोग्य आणीबाणी घोषित

नागरिकांनी सूचनांचे पालन करावे

मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराला घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क रहावे व सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच या आजाराबाबत संशयित रुग्ण आढळल्यास किंवा काही लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन अमगोथू रंगा नायक, आयुक्त, आरोग्य सेवा तथा व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()