विरोधकांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या- तालिका अध्यक्ष

विरोधकांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या- तालिका अध्यक्ष
Updated on

मुंबई- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी झाली. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधकांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला. यावर बोलताना तालिका अध्यक्ष यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. मला आई-बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या, असं तालिका अध्यक्ष भास्कर जाधव म्हणाले. (monsoon assembly session bhaskar jadhav angry over bjp devendra fadanvis)

महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. सदस्यांना बसू नका असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. प्रस्ताव मांडण्यापूर्वीच विरोधकांनी हरकत घेतली. प्रस्ताव मंजूर करत असताना सदस्य व्यासपीठावर आले. विरोधकांनी माईक खेचण्याचा प्रयत्न केला. सभागृहातील गोंधळानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधक-सत्ताधारी बसून तोडगा काढतात. सभागृहाबाहेर गेल्यानंतर आपण कधीही कटुता ठेवत नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी बसल्यानंतर फडणवीस लाललाल होऊन माझ्याकडे आले, मी बोलायची संधी न दिल्याने ते रागावले होते. विरोधक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. विरोधकांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या. तुम्ही 50-60 आले तरी मी एकटा आहे. एक पाऊल सुद्धा मी मागे हटणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.

विरोधकांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या- तालिका अध्यक्ष
भाजपचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित

आज लांच्छनास्पद गोष्ट घडली. महाराष्ट्राच्या काळीमा फासणारी ही गोष्ट आहे. प्रश्न ओबीसी आरक्षणाचा होता. तुम्ही एवढा का राग धरावा. एखादा ओबीसी नेता आपले मत मांडत असेल तर काय हरकत आहे. आज काळीमा फासण्याची गोष्ट झाली. मी शिव्या दिल्याचं भाजप नेत्यांनी बाहेर मीडियामध्ये सांगितलं. माझी आदेश वजा सूचना आहे. याचा छडा लावा. सीसीटीव्ही कॅमेरा तपासा. एकही असंसदीय शब्द मी वापरला असेल तर कोणतीही शिक्षा भोगण्यात मी तयार आहे. हे सिद्ध करुन दाखवा. आजचा माझ्या आयुष्य़ातील काळा दिवस, असं तालिका अध्यक्ष म्हणाले. त्यानंतर सभागृहात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. प्रस्ताव मंजूर झाला असून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.