Monsoon Update : बळीराजाची चिंता मिटणार! मान्सून महाराष्ट्रात दाखल, कोकणात सरी बरसण्यास सुरूवात

Monsoon Update : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकणामध्ये मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता शेतकरी राजाची चिंता मिटली आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateEsakal
Updated on

शेतकऱ्यासांठी महत्त्वाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तर कोकणात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. कोकणात मान्सूनच्या सरींना सुरूवात झाली आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कालपासून पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. कोकणामध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. यासंबधीची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यासंबधीचे वृत्त टिव्ही ९ मराठीने दिले आहे.

पुणे, सांगली, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने तडाखा दिला आहे. तर आज (ता. ६) राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे.

पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमान कमी होत आहे. बुधवारी (ता.४) पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. कर्नाटक किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत असून, अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा वाढला आहे.

Monsoon Update
Weather Update : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा; हायअलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

  • कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

  • मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

  • मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली.

  • विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

Monsoon Update
Maharashtra Lok Sabha election result 2024 : मराठवाड्याचा किंगमेकर कोण? शरद पवार की मनोज जरांगे? महाराष्ट्राचा निकाल बदलवणारे 'ते' चार शब्द...

आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अल्रर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Monsoon Update
Devendra Fadnavis: मराठा समाजाची नाराजी की लोकनेता दाखवण्याची इच्छा? फडणवीसांच्या राजीनामास्त्रच्या मागची इनसाईड स्टोरी काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.