Monsoon Latest Update : दिवसभरातील पावसाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा 'यलो अलर्ट'
Rain
RainSakal
Updated on

'या' जिल्ह्यामध्ये हलक्या सरी बरसणार

पालघर, ठाणे, घोडबंदर, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा या घाट परिसरात हवामान विभागाकडून पुढील दोन-तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढच्या आठवड्यात पावसाची विश्रांती

उद्यापासून नवीन आठवड्याला सुरुवात होतेय. या आठवड्यात पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील प्रमुख ३२ धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा

राज्यातील प्रमुख ३२ धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठा आहे. सूर्या आणि मोडकसागर ही दोन धरणं शंभर टक्के क्षमतेने भरलेले आहेत.

कोयना धरण विद्युत गृहातील एक युनिट बंद केले

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कोयना धरण पायथा विद्युत गृहातील एक युनिट दुपारी 4 वाजता बंद करण्यात आले आहे.

कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पाऊस ओसरला, नद्यांची पाणी पातळी नियंत्रणात

कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पाऊस ओसरला आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी नियंत्रणात आहे. सरींचा पाऊस सुरू आहे, पण आता अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान त्याची आकडेवारी समोर आली आहे. अजूनही कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणारे घाट रस्ते सुरक्षित नाहीत.

कोयना, वारुंजी, हेळवाक केरा पुलाची अशी आहे पाणी पातळी

1) कोयना जुना पूल

कराड - पाणी पातळी- ५५५.७१४(१८ʼ९") (इशारा -४५ʼ) (धोका-५८ʼ४ʼʼ)

2) वारुंजी - पाणी पातळी - ५५४.७३७ (१७'५") विसर्ग १२१२० क्युसेक (इशारा-४३ʼ१०") (धोका - ५१ʼ८")

3) हेळवाक पूल - पाणी पातळी ५७४.४० मी. (इशारा ५७६.८० मी.) (धोका ५७८.६० मी)

4) केरा पूल पाटण - पाणी पातळी ५६७.३० मी. (इशारा ५७०.४५ मी.) (धोका ५७२.९७ मी.)

मुरगुडमधील ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव भरला

मुरगुड परिसरात गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसाने मुरगुड, यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारा ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला. पावसाने उसंत घेतली असली तरी तलावा मधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गतवर्षी पेक्षा पंधरा दिवस उशिरा तलाव भरला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून कळंबा तलाव कोल्हापूरकरांची भागवतोय तहान

गेल्या महिन्यात संपूर्ण आटलेला कळंबा तलाव शनिवारी तुडुंब भरला. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच तलाव भरून ओसंडून वाहू लागल्याने बघ्यांची गर्दी झाली. कळंबा तलाव 1883 मध्ये बांधला आहे. तलावाचा जलाशय 93.13 हेक्टरमध्ये आहे. पाणी साठवण क्षमता 2.758 टी.एम.सी. इतकी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा तलाव कोल्हापूरकरांची तहान भागवत आहे.

पंचगंगेची पाणी पातळी 40 फूट 11 इंचांवर

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरकरांच्या उरात धडकी भरवणार्‍या पंचगंगेच्या पुराला आता उतार सुरू झाला आहे. शनिवारी पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत घट सुरू झाली आहे. 41.4 फुटांपर्यंत गेलेली पातळी रात्री 40 फुटांपर्यंत खाली आली. जिल्ह्यातील आणखी 18 बंधार्‍यांवरील पाणी ओसरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. कोल्हापूर शहरातील काही भागांना पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव आणि कडवी धरण शनिवारी पूर्ण क्षमतेने भरले. राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे.

राऊतवाडीचा धबधबा पर्यटकांसाठी खुला

राशिवडे बुद्रुक : पावसाने उसंत घेतल्याने राऊतवाडीचा धबधबा पर्यटकांना आजपासून पाहता येणार आहे; मात्र ज्या दिवशी रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा धबधब्यावर जायला बंदी असणार आहे.

Rain
पर्यटकांसाठी खुशखबर! सह्याद्रीच्या डोंगर रांगेवरून कोसळणारा 'हा' फेमस धबधबा पर्यटनासाठी खुला; पण..

काळम्मावाडी धरण ६६ टक्के भरले

काळम्मावाडी धरण आज ६६ टक्के इतके भरले आहे. १६. ७६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टीएमसी अधिक पाणीसाठा कमी वेळात झाला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी या धरणात सहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा धरणाने तळ गाठला होता.

Rain
Kolhapur Rain : 22 तासांत पंचगंगेची तब्बल 'इतकी' पाणी पातळी झाली कमी; कोल्हापुरातील 14 धरणांत काय आहे स्थिती?

राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा खुला

राधानगरी : गेल्या दोन दिवसांपासून राधानगरी तालुक्यामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे. तरीही पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुळे आज दुपारी राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा खुला झाला आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरण ६६ टक्के भरले असून गतवर्षीच्या तुलनेत पाच टीएमसी अधिक साठा आजस्थितीला झाला आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी

पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कमी कमी होत गेला आहे. जलाशयाचा एकूण पाणीसाठा ६८.८५ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद २५ हजार ९७३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ६९ मिलिमीटर, नवजाला ९९ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात आज पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे.

पुणे जिल्ह्यात २५९ मिलिमीटरची पावसाची नोंद

पुणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातील जून महिना कोरडा ठणठणीत गेला असला तरी जूलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. यानुसार जुलै जिल्ह्यात २५९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाचे हे प्रमाण जिल्ह्यातील या महिन्यातील सरासरी पावसाच्या ९३ टक्के इतके असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पावसाच्या आकडेवारी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Rain
Pune Rain News : पुणे जिल्ह्यात २५९ मिलिमीटरची पावसाची नोंद

विदर्भासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज पावसाचा 'यलो अलर्ट'

Monsoon Latest Live Update : राज्यात सध्या दमदार पावसानं हजेरी लावलीये. अनेक जिल्ह्यांत चांगला पाऊस चांगला झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. संपूर्ण विदर्भासह कोकणातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, संपूर्ण विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.