Monsoon Update : मॉन्सून उद्या महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता; कर्नाटकपर्यंत मजल; ‘बिपरजॉय’मुळे बळकटी

केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक
Monsoon Update
Monsoon Updatesakal
Updated on

पुणे : अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवाहांना बळकटी मिळाली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच कर्नाटकच्या किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली आहे. गोव्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्नाटकमधील कारवारपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे. सोमवारपर्यंत (ता. १२) गोवा आणि महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

Monsoon Update
Monsoon Update: एल-निनो सक्रिय! यंदा दुष्काळाची भीती, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

मॉन्सूनने गुरुवारी (ता. ८) देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये हजेरी लावली. केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तमिळनाडूमध्ये मॉन्सूनने वाटचाल केली. शनिवारी (ता.१०) मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र,

केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक दिली आहे.मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनाल, आदिरामपट्टीनमपर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Monsoon Update
Monsoon Update : अखेर मॉन्सून केरळात दाखल; भारतीय हवामान विभागाकडून मोठी अपडेट

चक्रीवादळाची तीव्रता कायम

अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता कायम आहे. शनिवारी (ता. १०) ही प्रणाली गोव्यापासून ७०० किलोमीटर वायव्येकडे, मुंबईपासून ६२० किलोमीटर पश्चिमेकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून ६०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे होती. ईशान्य दिशेकडे सरकणारी ही प्रणाली आजपासून काहीशी वायव्येकडे वळण्याचे संकेत आहेत.

वादळामुळे अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात, म्यानमार किनाऱ्यावरील कमी दाब क्षेत्र ठळक झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.