Monsoon Update: मान्सूनबाबत मोठी अपडेट! IMDच्या माहीतीनुसार मान्सून लांबला

केरळसह महाराष्ट्रातही पाऊस 4 ते 5 दिवस उशिराने
Monsoon Update
Monsoon Updatesakal
Updated on

राज्यात मान्सून दाखल होण्याआधी अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, IMD ने मान्सूनबाबत पुन्हा शक्यता वर्तवली आहे. मान्सून काल (रविवारी) केरळमध्ये दाखल होणार होता. मात्र, त्याची सुरुवात झाली नाही. भारतीय हवामान विभागाकडुन आता मान्सून आणखी तीन ते चार दिवस उशीरा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो.

पंरतु अजुनही केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लांबला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून आता लक्षद्विपपर्यंत पोहोचला असुन केरळमध्ये मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस उष्णता असणार आहे.

Monsoon Update
Cabinet Expansion : १९ जूनच्या आधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?, नव्या चेहऱ्यांना भाजप देणार संधी

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार, 'मे महिन्याच्या शेवटचे १५ दिवस ते 4 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल. पण केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज चुकला आहे.

हवामान विभागाने रविवारी दिलेल्या एका निवेदनात, 'दक्षिण अरबी समुद्रावरील पश्चिमेकडील वाऱ्यांच्या वाढीमुळे परिस्थिती अनुकूल होत असून पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली हळूहळू वाढत आहे. 4 जून रोजी पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली सरासरी समुद्रसपाटीपासून 2.1 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. आग्नेय अरबी समुद्रावरील ढगांचे प्रमाणही वाढत आहे. पुढील तीन-चार दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा आहे, यावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आज सोमवारी पुढील अपडेट्स दिले जातील असं म्हंटलं आहे.

Monsoon Update
Ajit Pawar: राष्ट्रवादीचा नवा फंडा! विधानसभेत 'या' नेत्यांना देणार उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.