Kirit Somaiya : ''बीभत्स वर्तणूक, विकृत वृत्ती... किरीट सोमय्यांवर देवाची काठी पडली'' विधानसभेत वायकर संतापले

Kirit Somaiya
Kirit Somaiyaesakal
Updated on

मुंबईः विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दहावा दिवस होता. विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचं थेटपणे नाव घेऊन टीका केली. किरीट सोमय्या यांच्यावर देवाची काठी पडली, असं विधान वायकर यांनी केलं.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते, खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हीडिओमुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. विरोधकांनी सभागृहात पेन ड्राईव्ह दिल्याने आश्चर्य व्यक्त झालं होतं.

Kirit Somaiya
Chhota Rajan Acquitted: दत्ता सामंत खून प्रकरणात छोटा राजनची निर्दोष मुक्तता

त्यानंतर आज ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी किरीट सोमय्या यांचं नाव घेऊन त्यांनी विनाकारण इतरांना त्रास दिला, त्यामुळे त्यांच्यावर देवाची काठी पडल्याचं विधान केलं. ही आपली संस्कृती नसून खोटे आरोप करुन दुसऱ्यांना बदनाम केलं जात आहे, असंही ते म्हणाले.

Kirit Somaiya
Video : आमदारांना किती हा त्रास! 'कॅन्टीन'मध्ये खायला मिळेना, कुणीही येतंय धक्का देतंय, वॉशरुममध्ये पाणी वाहतंय...

काय म्हणाले वायकर?

रविंद्र वायकर म्हणाले की, माणुसकीने जगलं पाहिजे, माणुसकीने वागलं पाहिजे. खोटेनाटे आरोप करुन बदनाम करणार असाल तर चुकीचं आहे. आमच्यावर मुंबई महानगर पालिकेच्या भूखंडाच्या बाबतीत सुरुवातीला ५०० कोटींचे आरोप केले. त्यात तथ्य नव्हतं. नंतर म्हणाले आलिबागला १९ बंगले आहेत. जेव्हा अलिबागला गेले तेव्हा तिथे काहीच सापडलं नाही. मग म्हणाले मुख्यमंत्र्यांनी बंगले गायब केले, असं वागणं चूक आहे.

एखाद्यावर खोटेनाटे आरोप करायचे, बदनामी करायची त्यामुळेच देवाची काठी कधी ना कधी पडते. ती काठी आज पडली. बीभत्स वर्तणूक विकृत वृत्ती देशाला दिसून आली, असं म्हणत आमदार वायकर यांनी किरीट सोमय्या यांचं थेटपणे सभागृहात नाव घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.