मुंबईः विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात निवेदन केलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर आसूड ओढला. पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव घेऊन ते माझ्या का मागेल लागले, असा प्रश्न शिंदेंनी उपस्थित केला.
सभागृहात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मागील वर्षभर सरकार पडणार-पडणार, अशी भाकितं सुरु होती. पृथ्वीबाबा माझे चांगले मित्र आहेत परंतु ते माझ्या मागे लागले होते. नवीन मुख्यमंत्री होणार, असं ते का म्हणाले हे मी त्यांना विचारलं नाही.
पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारला आता मोठं पाठबळ मिळालं असून १७०चं संख्याबळ २१५ वर गेलेलं आहे.
''कुणी आपल्या पंतप्रधानांना बॉस म्हणतो, कुणी सेल्फी काढतो, कुणी वाकून नमस्कार करतो. काही म्हणतात, तुम्ही पॉवरफुल आहात. हे आपल्याला अभिमानास्पद आहे. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आणली. ९ वर्षात एकही सुट्टी न घेतलेला पंतप्रधान आपण बघितला आहे. त्यांचं नेतृत्व या देशाला प्रगतीपथाकडे नेईल. त्यामुळे अजित पवारदेखील सोबत आलेले असून सरकार मजबूत बनलं आहे.''
एकनाथ शिंदेंनी १७० चा आकडा २१५वर गेल्याचं सभागृहात सांगितल्याने अजित पवार गटाकडे ४५ आमदार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे सद्य घडीला ८ आमदार असल्याचं दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.