Monsoon session 2024 : अधिवेशनामध्ये कोणते निर्णय घेणार? मुख्यमंत्र्यांनीच केलं स्पष्ट

''एवढं करुनही काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या. त्यांना २४० पर्यंत पोहोचायला २५ वर्षे लागतील. मोदी देशाचं पंतप्रधान झाले आहे. यांचं मात्र गिरे तो भी टांग उपर, अशी गत झाली आहे. उबाठाच्या समोरासमोर आम्ही १३ जागा लढलो. त्यांना केवळ साडेतेरा टक्के मतं मिळाली आहेत.''
eknath shinde devendra fadnavis ajit pawar
eknath shinde devendra fadnavis ajit pawaresakal
Updated on

मुंबईः राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरु होत आहे. अधिवेशनापूर्वी सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

आयोजित पत्रकार परिषदेपूर्वी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांची सभागृहात बोलायची तयार नाहीये, खोटं बोल पण रेटून बोल असं त्यांचं सुरु आहे. आवसान गळालेला आणि गोंधळलेला विरोधी पक्ष.. यावेळी छाती फुगवून आला आहे. लोकसभेमध्ये त्यांना काही प्रमाणात यश मिळालं असेल परंतु तो क्षणिक आनंद आहे.

eknath shinde devendra fadnavis ajit pawar
Whatsapp Tips : व्हॉट्सॲपवर ब्लॉक झाल्याची शंका आहे? फक्त नो डीपी नाही तर 'या' 4 हिंट्स मधून कळेल तुमचा नंबर ब्लॉक आहे की अनब्लॉक

''एवढं करुनही काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या. त्यांना २४० पर्यंत पोहोचायला २५ वर्षे लागतील. मोदी देशाचं पंतप्रधान झाले आहे. यांचं मात्र गिरे तो भी टांग उपर, अशी गत झाली आहे. उबाठाच्या समोरासमोर आम्ही १३ जागा लढलो. त्यांना केवळ साडेतेरा टक्के मतं मिळाली आहेत.''

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी काम करणारं हे सरकार आहे, एक रुपयामध्ये पीक विमा देणारं हे सरकार आहे.. मेट्रो, समृद्धी महामार्ग, महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत. शासन आपल्या दारी यासारखी मोठी योजना सरकारने सुरु केली. त्यामुळे कोट्यवधी लोकांना याचा फायदा झाला आहे.

eknath shinde devendra fadnavis ajit pawar
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रकाश आंबेडकरांचा सूर का बदलला? कुणबी दाखले तातडीने थांबवण्याची मागणी

''शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब लोकांसाठी सरकारने काम केलं असून उद्याच्या अधिवेशनामधूनही ज्येष्ठ, तरुण, माता-भगिनींच्या हिताचे निर्णय होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये गुंतवणुका येत आहेत. आज आपण पाहातोय, सरकारी नोकऱ्या भरती सुरु केलेली आहे, पोलिस भरतीदेखील सुरु आहे. हे सरकार सर्वसमावेशकपणे काम करतंय, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.'' असं शेवटी मुख्यमंत्री म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.