Monsoon Session: "वंदे मातरम् बोलू शकत नाही कारण..." अबू आझमींच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक, फडणवीसांनी दिला सल्ला

Monsoon Session
Monsoon Session
Updated on

Monsoon Session : महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात गोंधळ झाला.

अबू आझमी म्हणाले, आफताब पुनावला याने चुकीचे कृत्य केले. मात्र संपूर्ण देशात मुस्लीमांविरोधात नारे सुरू झाले. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात सकल हिंदू समाज मोर्चे निघाले. या मोर्चात मुस्लिमांचा अपमान करण्यात आला.

२९ मार्चला संध्याकाळी ५ वाजता. तीन लोक औरंगाबादमध्ये राम मंदिराजवळ आले. मला यावेळी चुकीचे उत्तर दिले. यावेळी नारे दिले या देशात राहायचे असले. वंदे मातरम् म्हणावे लागेल. मात्र आम्ही  वंदे मातरम् नाही म्हणून शकत  कारण आम्ही अल्लाला मानतो. अल्लाशिवाय आम्ही कुणाच्या समोर डोक टेकवत नाही, असे अबू आझमी म्हणाले.

Monsoon Session
Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे अध्यक्षांना स्मरणपत्र

यावेळी भाजप आमदार आक्रमक झाले. इस देश मे रहना होगा तो वंदेमातरम कहना होगा, अशा घोषणा सभागृहात देण्यात आल्या.  

अबू आझामी म्हणाले औरंगाबादमध्ये ३० लोक आले. यानंतर वाद झाला. ज्यांनी गाड्या जाडल्या त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहीजे.

मात्र यावेळी पोलिसांकडून गोळी चालवण्यात आली. लाईट देखील नव्हती. मोनीरुद्दीन नावाच्या माणसाला गोळी लागली. तो एकटा कमावता होता. ज्याने पोलीस कर्मच्याऱ्याने गोळी चालवली त्याच्यावर कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी अबू आझमी यांना विनंती या देशात करोडो लोकांची वंदे मातरम् बाबत श्रद्धा आहे. आझमी यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. असा कोणता धर्म सांगेल की आपल्या आईला मान देऊ नका. हे धर्म गीत नाही. वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. तुमची भावना योग्य नाही.

Monsoon Session
Sharad Pawar Latest News : अजित पवारांच्या शरद पवार भेटीमागचे खरे कारण आले समोर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.