Monsoon Session : अजित पवारांचा शेतकऱ्यांना दिलासा! मदतीची रक्कमही दुप्पट

Ajit Pawar
Ajit Pawar
Updated on

मुंबई - राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुलडणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार धावले आहे.

Ajit Pawar
Uddhav Thackeray : 'भावी मुख्यमंत्री'चं सोडा! मुंबईत उद्धव ठाकरेंचे 'भावी पंतप्रधान'चे बॅनर

पावसाळी अधिवेशनात अजित पवार यांनी मोठी शेतकऱ्यांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. १९ ते २३ जुलै या कालावधीत यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात पीक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.

दरम्यान नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आता पाच हजार ऐवजी १० हजार रुपये मदत देण्यात येईल अशी घोषणा अजित पवार यांनी सभागृहात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.