Monsoon Session: भाई जगतापांचा रुसवा फडणविसांनी काढला पण, विधानपरिषदेत निलम गोऱ्हे भडकल्या...

विधान परिषदेत झाला राडा
Monsoon Session
Monsoon Session
Updated on

Monsoon Session: महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. विरोधक आणि सत्ताधारी अनेक मुद्द्यांवर भांडताना दिसले. आज विधान परिषदेत चांगलाच गोंधळ झाला. सभागृहात भाई जगताप यांना निलम गोऱ्हे यांनी बोलू न दिल्याने मोठा राडा झाला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  भाई जगताप यांची समजूत काढत त्यांना बोलण्याची विनंती केली. तरी निलम गोऱ्हे यांच्या दिशेने हात करत भाई जगताप यांनी संतापाने आपलं म्हणणे मांडने टाळले. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता.

निलम गोऱ्हे यांच्यात खूप बदल झाला आहे. आता त्यांना जे काम दिलं आहे ते इमाने इतबारे करत आहेत, असा टोला भाई जगताप यांनी निलम गोऱ्हे यांना लगावला. यानंतर निलम गोऱ्हे देखील संतापल्या.

Monsoon Session
आम्ही 'इंडिया' आहोत याचा अभिमान, तुम्ही...: पृथ्वीराज चव्हाण यांचे मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर

मी कुणालाही जाणीवपूर्वक थांबवत नाही. माझं काम मी करत आहे. उगाच राजकिय शेरेबाजी करू नका. जाणीवपूर्वक मला बोललेले चालणार नाही. भाई जगताप तुम्ही एकटेच बोलतं बसा. मी माझे अधिकार वापरणार मी काही कमकुवत नाही, असे म्हणत निलम गोऱ्हे यांनी भाई जगताप यांना फटकारले.

विधानसभेत देखील काँग्रेस आमदारांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळत आहे. विरोधकांमध्ये काँग्रेस सध्या सर्वात मोठा पक्ष आहे. संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते देखील आता काँग्रेसचा असणार आहे. नाना पटोले, भाई जगताप, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर पावसाळी अधिवेशना आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत.

Monsoon Session
Biren Singh: "मी फक्त तेव्हाच राजीनामा देणार जेव्हा..."; मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना धुडकावलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.