मोठी बातमी! मिठी नदीच्या गाळ प्रकरणी एसआयटी चौकशी; मंत्री सामंत यांची घोषणा

mithi river
mithi river
Updated on

Mumbai News - अधिवेशनात आज मुंबईतील मिठी नदीचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यातच आता 2005 पासून 2023 पर्यंत नदीच्या सौंदर्यासाठी किती खर्च झाला. तसेच गाळ काढण्यावर किती खर्च झाला याबाबत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे.

mithi river
Jayant Patil : अजित पवारांकडून मिळाला सर्वाधिक निधी? जयंत पाटील स्पष्टच बोलले...

मिठी नदी आणि ओढ्यातील गाळ काढण्यात भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. यावर उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी घोषणा केली. संबंधित काम पालिका आणि MMRDA यांच्याकडे होत.

मिठी नदीच्या रुदीकरण व सौदर्यीकरणावर ११६० कोटी खर्च झाले. याचे कंत्राटदार कोण किती पैसे कुठे खर्च करण्यात आले. याबाबत उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे करण्यात येईल. तसेच राज्य सरकार या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करणार असल्याचं सामंत यांनी म्हटलं. आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला सामंत यांनी उत्तर दिलं.

mithi river
Sushma Andhare: सुषमा अंधारेंनी काढला भ्रष्टाचाराचा काळा चिठ्ठा! गुलाबराव पाटलांच्या जिल्ह्यात मध्यान्ह भोजनासाठी ८ कोटी खर्च

तत्पूर्वी मिठी नदी रुंदीकरण आणि सौंदयीकरणावरून अनिल परब आणि मंत्री उदय सामंत यांच्यात आज खडाजंगी पाहायला मिळाली. मंत्री सभागृहात खोटी माहिती देत आहेत. खोटी माहिती घेऊन मंत्री सभागृहात येतात, अशी टीका अनिल परब यांनी उदय सामंत यांच्यावर केली होती.

त्यावर उदय सामंत म्हणाले की, आम्ही कोणतीही खोटी माहिती दिली नाही. आम्हालाही सभागृहात चार वर्षाचा अनुभव आहे. आम्हालाही सभागृहात बोलण्याचा अनुभव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.