Monsoon Update : मिरगाचा पाऊस कधी पडणार? शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, 'हवामान'चा अंदाजही ठरला फोल

मृग नक्षत्र (Mrig Nakshatra) ८ जूनला सुरू झाले असून शेतकरी मिरगाचा पाऊस कधी बरसणार, याकडे डोळे लावून बसला आहे.
Rain News
Rain Newsesakal
Updated on
Summary

मागील दहा-बारा दिवसांपूर्वी हलक्याशा वळीव पावसाच्या सरी बरसल्या. मात्र, पुरेसा पाऊस न पडल्याने पेरणी केलेल्या रानात अर्धवट उगवण झाली असून उगवून आलेले भाताचे मोड चिमण्या खाऊ लागल्या आहेत.

कोकरूड : भातपिकाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात (Shirala Taluk) खरीप हंगामातील (Kharif Season) भात पेरणी झाली असून उर्वरित भुईमूग, नाचणी, सोयाबीन, मका पेरणी करणे बाकी आहे. बळिराजाला आता पावसाची (Monsoon Update) प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वळवाने हजेरी लावली असली, तरी अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्र (Mrig Nakshatra) ८ जूनला सुरू झाले असून शेतकरी मिरगाचा पाऊस कधी बरसणार, याकडे डोळे लावून बसला आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून बरसणार, असा अंदाज हवामान खात्याने (Meteorology Department) वर्तविला होता. मात्र, अजून पावसाची चिन्हे दिसेनाशी झाली आहेत.

Rain News
Koregaon : मस्तीचा बैल चालत नसतो, त्याला वेसण..; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा कोणाला इशारा?

उन्हाचे चटके सोसत रखरखत्या उन्हात पेरणीयोग्य शेत करत तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी २५ मे रोजी रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त गाठला. या मुहुर्तावर शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणीस सुरवात केली. आता पाऊस लांबल्याने भात पेरणी केलेल्या रानात विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी देण्याची वेळ आली आहे.

मागील दहा-बारा दिवसांपूर्वी हलक्याशा वळीव पावसाच्या सरी बरसल्या. मात्र, पुरेसा पाऊस न पडल्याने पेरणी केलेल्या रानात अर्धवट उगवण झाली असून उगवून आलेले भाताचे मोड चिमण्या खाऊ लागल्या आहेत. त्यामुळे नदी, विहीर व कालव्यावरील विद्युत पंप, इंजिन याद्वारे पेरणी केलेल्या शेताला पाणी दिले जात आहे.

Rain News
Cyclone Biparjoy : गणपतीपुळेला जाण्याचा विचार करताय? मग ही बातमी आधी वाचा, अन्यथा होऊ शकतं नुकसान!

गतवर्षी हिवाळ्याबरोबरच उन्हाळ्यामध्येही पावसाने चांगलेच झोडपले होते. परिणामी अनेकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कधी पावसामुळे, तर कधी पावसाअभावी शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

पेरणी झाली; मात्र सिंचनाची सोय नाही..

शिराळा पश्चिम भागातील मेणी, आटूगडेवाडी, गवळेवाडी, रांजणवाडी, शिरसटवाडी, गुढे, पाचगणी, कुसळेवाडी, कदमवाडी, खुंदलापूर व उत्तर भागातील अनेक डोंगरकपारीत असलेल्या गावांत २२ ते २५ मे दरम्यान पेरणी केली असून या भागात सिंचनाची सोय नसल्याने हा भाग पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

Rain News
Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय महत्त्वपूर्ण निर्णय; आमदार गोरेंची माहिती

वाणांची निवड

९० ते १२० दिवसांत काढणीला येईल, अशा भात पिकाच्या वाणाची निवड केली जाते. यामध्ये कोमल, सोनम, जोंधळे, गोरक्षनाथ, रत्नागिरी-१, इंद्रायणी, आर-१, बासमती, सिल्की-२७७, भोगावती, मेनका, नाथ पोहा अशा पारंपरिक, संकरित व संशोधित सुधारित जातीच्या बियाणांची निवड केली आहे.

Rain News
Shakti Yojana : महिलांना मोफत बसप्रवासासाठी मूळ ओळखपत्राची गरज नाही; 'परिवहन'चा मोठा निर्णय

तालुक्यात २३ हजार हेक्टरवर खरीप पेरणी

शिराळा तालुक्यात उसाबरोबर भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र भातासाठी, ५ हजार ४०० हेक्टर क्षेत्र सोयाबीन, ४ हजार क्षेत्र भुईमूग, ५०० हेक्टर क्षेत्र मका, २०० हेक्टर क्षेत्र ज्वारी, तर १५० हेक्टर क्षेत्र बाजरी अशा २३ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.