Rain Updates : सात दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन; कुठल्या विभागात कोणत्या तारखेला पाऊस?

Rain Update
Rain Updatesakal
Updated on

पुणेः राज्यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी पावसाने हाहाःकार माजवला होता. यवतमाळ, धुळे, कोल्हापूर, रायगड, मुंबई या भागात मोठा पाऊस झाला. राज्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात पावसाचं पुनरागमन होणार आहे.

आज दिलेल्या अंदाजानुसार १८ ते २४ ऑगस्टदरम्यान विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर वरुणराजाची कृपा होऊ शकते. तर २५ ते ३१ ऑगस्टदरम्यान कोकण, विदर्भ तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Rain Update
Covid Scam : कोविड काळातील बॉडी बॅग प्रकरण! 'वेदांता इंनोटेक'ला गुन्हे शाखेचे समन्स

पुढील सात दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रासहीत पश्चिम आणि दक्षिण भारतात पाऊस बरसणार आहे. मराठवाडा भागामध्ये पावसाचे प्रमाण सध्या अत्यल्प आहे. शेतकरी हवालदील झालेले असून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही पुढील सात दिवसांमध्ये हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाची शक्यता अत्यल्प आहे. त्यामुळे पिकांचं काय होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

Rain Update
Section 377: अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचं कलम वगळलं! आरोपी पुरुषांसाठी नाही शिक्षेची तरतूद

दोन आठवड्यापूर्वी राज्यात पावसाने कहर केला होता. मुंबईची तुंबई झाली होती. ठाणे, रायगड भागात हाहाःकार माजला होता. विदर्भातील अनेक नद्यांना पूर आला होता, त्यामुळे नागरिकांना रेस्क्यू करावं लागलं. त्यानंतर मात्र पावसाने तूट दिलेली. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.