Monsoon Update : मोठी बातमी! राज्यात मान्सून दाखल; दक्षिण कोकण अन् दक्षिण मध्य महाराष्ट्रात हजेरी

Weather Update
Weather UpdateANI
Updated on

मुंबईः यंदाच्या मान्सूनबाबत मोठी अपडेट हाती आलेली आहे. आज ११ जून २०२३ रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या वतीने यासंदर्भात माहिती देण्यात आली.

महाराष्ट्रात येत्या ३-४ तासात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, IMD ने याबाबत माहिती दिली आहे.

Weather Update
Ajit Pawar : अजितदादांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेते संपर्कात? दादा पुन्हा रुसले? थेट पत्रकार परिषद घेतली अन्...

८ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र आज राज्यात मान्सूनने हजेरी लावली. राज्यात पुढच्या 4, 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे. तर कर्नाटकातील शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटा इथपर्यंत मान्सून पोहोचला आहे.

यावर्षी मान्सून चार ते पाच दिवस उशिरानं दाखल झाला आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच, हवामान विभागाने येत्या तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, IMD ने याबाबत माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.