Monsoon News : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मान्सून उशिराने दाखल होणार; तज्ज्ञ सांगतात...

rain
rainsakal
Updated on

मुंबईः भारत देश कृषीप्रधान असल्याने देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. यावर्षी मान्सून जरासा उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसत असल्याने विलंबाने मान्सून दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

rain
Bhagat Singh Koshyari : कोश्यारी राजभवनात परतले! सत्तेच्या गदारोळात नव्या राज्यपालांना मार्गदर्शन?

संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असते. २२ मे रोजी दरवर्षी मान्सून देशात दाखल होतो आणि १ जून रोजी केरळमध्ये येतो. परंतु यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. चक्रीवादळ आणि बदललेल्या परिस्थितीमुळे २२ मेची तारीख हुकणार आहे. केरळमध्ये नेमका कधी येणार, याबद्दल निश्चितता नाही.

rain
Shahdol News: मृत्यूनंतरही यातना! मध्यप्रदेशातील धक्कदायक घटना, मोटारसायकलवरून मुलीचा मृतदेह घेऊन गेला बाप...

मागच्या वर्षी १ जूनच्या ऐवजी ३ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. यावर्षी ११ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होणार होईल तर ७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून येईल, असं स्कायमेटने सांगितलं आहे. तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सूनची गती धिमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य सल्ला घेऊनच पीकपेऱ्याचं नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.