राज्यात नव्या कोरोना बाधितांनी केला ३३ हजारांचा टप्पा पार; ८६ जणांचा मृत्यू

Sindhudurg Corona News Updates
Sindhudurg Corona News Updatessakal
Updated on

मुंबई : राज्यात काल झालेल्या दैनंदिन रुग्णसंख्या (corona new patients) आज पुन्हा वाढली. आज 33,914  नवीन रुग्णांची नोंद झाली. काल 28,287 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली होती. एकूण संख्या 75,69,425 झाली आहे. आज राज्यात 86 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,42,237 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.आज राज्यातील (Maharashtra corona update) सर्व मंडळांमध्ये मृत्यूंची नोंद झाली आहे.ठाणे 39,नाशिक 6,पुणे 28,औरंगाबाद 1,कोल्हापूर 3,लातूर 5,अकोल 2, नागपूर 2 मध्ये मृत्यू नोंदवले गेले. 

Sindhudurg Corona News Updates
मुंबई : नॅशनल पार्क मधील 'जीवन बिबट्या'ची रेडिओ कॉलर करुन सुखरुप सुटका

राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज 30,500 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 71,20,436 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 94.07 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 16,20,371 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,358 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 3,02,923 इतकी झाली आहे. 

राज्यात 13 ओमिक्रॉन बाधित

राज्यात आज  13 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. पुणे मनपा 12, पिंपरी चिंचवड मनपा 1 रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 2,858 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत.यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी 1,534 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत 6,328 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 92 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()