सिलिंडरच्या स्फोटात मायलेकाचा मृत्यू! आगीपुढे मुलाला वाचविण्याची आईची झुंज अपयशी; आईच्या कुशीतच चिमुकल्याने सोडला जीव

पतीचा उपवास असल्याने खिचडी करण्यासाठी पत्नी शिलाबाई धायगुडे (रा. तिल्हेहाळ, ता. दक्षिण सोलापूर) यांनी गॅस पेटवला. पण, त्याला गळती लागली होती. अचानक सिलिंडरचा स्फोट झाला आणि शिलाबाईसह शेजारी पलंगावर माणिक (वय ७) या दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
Solapur Crime
Solapur Crimeesakal
Updated on

सोलापूर : पतीचा उपवास असल्याने त्यांना खिचडी करण्यासाठी पत्नी शिलाबाई धायगुडे (वय ३०, रा. तिल्हेहाळ, ता. दक्षिण सोलापूर) यांनी घरातील गॅस पेटवला. पण, त्याला गळती लागली होती. काही वेळाने अचानक सिलिंडरचा स्फोट झाला आणि शिलाबाईसह शेजारी पलंगावर मोबाइल पाहत असलेल्या माणिक (वय ७) या दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २१) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

शिलाबाई यांचे पती म्हाळप्पा धायगुडे हे रिक्षा चालवतात. रविवारी उपवास असल्याने पतीने खिचडी करायला सांगितली. नळाला पाणी आल्याने पती म्हाळप्पा घराबाहेर होते. त्यांची मुलगी आजीसोबत बाहेर गेली होती. रविवारी शाळेला सुटी असल्याने माणिक हा चिमुकला घरीच होता. गॅस लिक झाला आणि सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यानंतरही शिलाबाईंनी मुलाला आगीपासून वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांची शर्थीची झुंज आगीपुढे अपयशी ठरली.

शिलाबाईच्या पतीसह ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण धुरामुळे आतील दोघांना बाहेर पडता आले नाही. दोघेही जागेवरच बेशुद्ध पडले आणि आगीत होरळून त्यांचा मृत्यू झाला. दोघांच्या मृतदेहाची सर्वोपचार रूग्णालयात उत्तरीय तपासणी झाली आणि त्यानंतर गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद वळसंग पोलिसात झाली आहे.

घटना पाहून पोलिसांचेही डोळे पाणावले

दहा फूट रूंद व १२ फूट लांबीच्या खोलीत म्हाळप्पा व शिलाबाई या दोघांचा सुखाचा संसार सुरू होता. त्यांना एक मुलगा व मुलगी झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता. पण, त्यांच्या सुखी संसारावर काळाची नजर पडली आणि रविवारी (ता. २१) झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात पत्नी शिलाबाई व चिमुकल्या माणिकचा डोळ्यादेखत मृत्यू झाला. आई शिलाबाईने स्फोटानंतर मुलगा माणिकला साडीच्या झाकून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आग व धुरामुळे त्यांना घराबाहेर पडता आले नाही. आईच्या साडीतच माणिकचा मृत्यू झाल्याची घटना पाहून पोलिसांचेही डोळे पाणावले. घटनास्थळी वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील, उस्मान शेख यांच्यासह कर्मचारी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.