Mother's Day : स्वराज्याचं बीज शिवरायांच्या मनात पेरणाऱ्या माता जिजाऊ स्वत: देखील युद्धकलेत होत्या निपुण

स्वराज्याचं बी शिवरायांच्या मनात पेरणाऱ्या माता जिजाऊंविषयी आज आपण मातृदिनविशेष मालिकेत सविस्तर जाणून घेणार आहोत.
Mother's Day
Mother's Daysakal
Updated on

Mother's Day : छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी खूप मोठे आदर्श आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा गायली जाते तेव्हा तेव्हा प्रत्येकवेळी शिवरायांना घडविणाऱ्या माऊलीचा म्हणजेच राजमाता जिजाऊसाहेबांचा उल्लेख हा केला जातो.

महाराष्ट्राच्या मातीला धगधगता उगवणारा सुर्य देणाऱ्या माता जिजाऊ यांची किर्ती तितकीच महान आहे. स्वराज्याचं बीज शिवरायांच्या मनात पेरणाऱ्या माता जिजाऊंविषयी आज आपण मातृदिनविशेष मालिकेत सविस्तर जाणून घेणार आहोत. (Mothers Day special Rajmata Jijau and chhatrapati shivaji maharaj mother son relationship)

१२  जानेवारी १५९८ रोजी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शिंधखेड गावात एका राजघराण्यात माता जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊंना चार भाऊ होते. राजघराणे असल्याने युद्धकला आणि राजनिती याचा जिजाऊंना आधीच खूप जवळून संबंध आला. त्यामुळे युद्धकला असो की राजनितीमध्ये त्या निपुण होत्या.

पुढे त्यांचा विवाह शहाजीराजांशी झाला. शहाजीराजे तेव्हा निजामशहाकडे सरदार म्हणून काम करायचे. १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर त्यांनी शिवाजी महाराजांना जन्म दिला. शिवाजी महाराजांना उत्तम संस्कार दिले. त्यांना घडविले.

पुण्याची जहागीर मिळाली १४ वर्षांचे असणाऱ्या शिवाजीराजांना घेऊन जिजामाता पुण्याला आल्या. पुण्यातच त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने शिवाजीमहाराजांना धर्मसंस्कार आणि युद्धकलेचे धडे दिले. जिजाऊ माता शिवाजी महाराजांना महाभारत आणि रामायणाच्या कथा सांगत असे. यातूनच एक शुरवीर राजा महाराष्ट्राला मिळाला. युद्धकला, न्यायनिवाडा, धर्म संस्कार महाराज आपल्या आईसाहेबांपासून शिकले आणि पुढे याच्याच जोरावर त्यांनी असंख्य लाखो लोकांचे मन जिंकली.

Mother's Day
Mother's Day : आई-मुलीच्या नात्यात रंग भरतात या गोष्टी

आजही राजा कसा असावा, याचे किर्तीवंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहे. जिजाऊ माता कायम शिवाजी महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहल्या. बारा बलुतेदार समाजाला एकत्र आणण्याचं बळ असो की स्वराज्याची स्थापना करण्यास महाराजांना प्रोत्साहन करणारे हात असो, माता जिजाऊ पावलोपावली त्यांच्यासोबत होत्या.

जेव्हा महाराज आग्रात कैद होते तेव्हासुद्धा स्वराज्याची सूत्रे जिजाऊमातेंंनी सांभाळली. महाराजांच्या अनुपस्थितीत सर्वांना एकत्रित ठेवून त्या राज्यकारभार चालवायच्या. शिवरायांचा राज्यभिषेकाचा सुवर्ण क्षण पाहिल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये राजमाता जिजाऊसाहेबांनी आपले प्राण सोडले.

Mother's Day
Raj Thackerays Mother Kunda Thackeray: ठाकरे कुटुंबातील ही व्यक्ती म्हणते "उध्दवचं मुख्यमंत्रीपद जावं असं...''

जिजाऊमाता एक आदर्श आहे. त्यांच्यामुळे आपल्याला एक जाणता राजा मिळाला ज्यांचे गुणगाण इतिहासाच्या पानापानांवर सुवर्ण अक्षरात कोरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राजमाता जिजाऊसाहेब आणि त्यांनी दिलेले संस्कार हे पिढ्यान् -पिढ्या आदर्श म्हणून ओळखले जाणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.