Motor Vehicles Act: खासगी वाहनांवर 'पोलीस' लिहिलय तर लगेच हटवा...आता होणार कडक कारवाई!

Strict Action Against Private Vehicles Misusing 'Police' Sticker: या आदेशामुळे आता राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलीस" लिहण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्याची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार आहे.
Regional Transport Offices to Take Action Against Unauthorized Use of 'Police' on Vehicles
Regional Transport Offices to Take Action Against Unauthorized Use of 'Police' on Vehicles esakal
Updated on

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस" लिहिलेले आढळून असल्यास त्या वाहनांवर कारवाई होणार आहे. मोटार वाहन अधिनियम, १९८८ व तद्गुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पत्रकार विकी जाधव यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस" लिहणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयाला केली होती.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश-

या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कार्यरत वायुवेग पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक तसेच सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी तपासणी दरम्यान खासगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस" लिहिलेले आढळल्यास, तसेच वाहनांवर 'महाराष्ट्र शासन' अशी पाटी किंवा बांध चिन्हांचा वापर असल्यास, दोषी वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ नियमांतील तरतूदीनुसार काटेकोरपणे कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.

Regional Transport Offices to Take Action Against Unauthorized Use of 'Police' on Vehicles
Keshvrao Bhosale Theater : काय आहे कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे रोम साम्राज्याशी खास कनेक्शन? शाहू महाराजांची दूरदृष्टी

स.अ. गिरी यांचे आदेश-

सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी स.अ. गिरी यांनी या आदेशानुसार राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस" लिहिलेले किंवा 'महाराष्ट्र शासन' अशी पाटी लावण्यात आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल खटला विभागात न चुकता सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

या आदेशामुळे आता राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलीस" लिहण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्याची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार आहे.

Regional Transport Offices to Take Action Against Unauthorized Use of 'Police' on Vehicles
Tribal Day : योगिताच्या पीएचडीला राज्य सरकारचे बळ ; अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी दीड कोटी रुपयांची शिष्यवृत्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.