शिवसेना दहशत पसरवते हे चुकीचे; गडकरींना सावंतांचे प्रत्युत्तर

Nitin gadkari and Arvind sawant
Nitin gadkari and Arvind sawante sakal
Updated on

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari to cm thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये सेनेचे कार्यकर्ते कामात अडथळा आणत असल्याची तक्रार गडकरींनी केली आहे. त्यावरच आता सेनेचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nitin gadkari and Arvind sawant
'कामात अडथळा', नितीन गडकरींचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. पण, एका भागात रस्ते उभारणीत कोणी त्रास देत असेल तर संपूर्ण शिवसेना दहशत पसरवत आहे हे बोलणे चुकीचे आहे. कोकणातील रस्त्याच्या उभारणीमध्ये अडथळे घालणारे आणि अधिकाऱ्यांना काळे फासणाऱ्यांविरोधात देखील गडकरींनी तक्रार करावी, असे सावंत म्हणाले.

उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यांनी याप्रकरणी पोलिसांना अहवाल मागवायला सांगितले आहे. दहशत घालणारे नक्की कोण आहेत, ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का? हे आधी पाहावे लागेल. जर कोणी शिवसेनेचा कार्यकर्ता असेल तर पक्षप्रमुख त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.

नितीन गडकरींनी पत्रामध्ये काय म्हटलंय? -

राज्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असताना शिवसेनेचे कार्यकर्ते कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करतात. अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण करीत काम बंद पाडत आहेत. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा देणारे पत्र नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिले आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कामाबाबत उल्लेख करण्यात आला आहे. तेथील सेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचे गडकरींनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.