आंदोलनाचा सगळ्यांनाच अधिकार, पण हे शोभणारं नाही : संभाजीराजे

Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati Sambhajirajeesakal
Updated on
Summary

आंदोलन करण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे; पण..

पुणे : एसटी महामंडळाचं (ST Workers) राज्य शासनात विलीनीकरण करावं, ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारनं अमान्य केल्यानं आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) या निवासस्थानी धडक दिली. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजीही केली. त्यामुळं या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे म्हणाले, मी आजच दिल्लीहून पुण्याला आलोय आणि एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पहायला मिळालं. आंदोलन करण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे. मात्र, हे शोभणारं नाहीय. हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीयत. एसटी कामगारांच्या बाजूंनी आम्ही ठाम आहोत; पण हे आंदोलन म्हणजे राज्याचे संस्कार नाहीयत, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

Chhatrapati Sambhajiraje
'..तर 200 कर्मचाऱ्यांनी जग सोडलं नसतं, याला फक्त शरद पवारचं जबाबदार'

22 एप्रिलपर्यंत हजर होण्याचा कोर्टाचा अल्टिमेटम

मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम दिलाय. तसंच कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीच्या मागण्याबाबत राज्य शासनाला आदेश दिलेत. या आदेशाचं आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. दरम्यान, जोपर्यंत हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणत्या तारखेला, किती वाजता एकाच वेळी निर्णय घेऊ, अशी भूमिका या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी माध्यमांशी बोलताना मांडली होती. मात्र, तरीही कामगार मोठ्या प्रमाणात एकत्र जमले असून त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केलीय.

Chhatrapati Sambhajiraje
'शरद पवारांनी आश्वासन पाळलं नाही म्हणून कर्मचारी आक्रमक'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.