Solapur News: ''भीमा" करणार पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप, खासदार धनंजय महाडिक यांचे वक्तव्य

Solapur News: पैलवान भीमराव (दादा) महाडिक सहकारी साखर कारखान्याची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात खासदार धनंजय महाडिक यांनी उस गाळपवर वक्तव्य केले आहे.
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikESakal
Updated on

सोलापूर: चालू गळीत हंगामात कारखान्याने 5 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून मोहोळ तालुक्यातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने किंबहुना त्याही पेक्षा जास्त दर देणार असल्याचे प्रतिपादन "भीमा" चे जेष्ठ संचालक तथा खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. साखरेची आधारभूत किंमत 3 हजार 100 रुपयांवरून 4 हजार 200 रुपये करावी यासह अन्य चार ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील पैलवान भीमराव (दादा) महाडिक सहकारी साखर कारखान्याची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार ता 28 रोजी संपन्न झाली. त्यावेळी खा. महाडिक मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी विश्वराज महाडिक होते. यावेळी कार्यकारी संचालक एस. जे. शिंदे, संचालक सुनील चव्हाण, तात्यासाहेब नागटिळक, सिद्राम मदने, संभाजी कोकाटे, बिभीषण वाघ, संतोष सावंत, बाळासाहेब गवळी, राजेंद्र टेकळे, चंद्रसेन जाधव, रामहरी रणदिवे, संतोष सावंत, सिद्राम मदने,ऍड.रामलिंग कोष्टी, सुधीर भोसले, छगन पवार, संग्राम चव्हाण, राजाराम बाबर,भारत पाटील, झाकीर मुलाणी आदींसह कारखान्याचे सभासद उपस्थित होते.

प्रारंभी स्व. भीमराव(दादा) महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल आणि विषय वाचन कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांनी केले. यावेळी इतर सर्व विषयांबरोबरच गतवर्षी मंजूर झालेल्या पैलवान भीमराव (दादा) महाडिक सहकारी साखर कारखाना या नाम बदलास हात उंचावून सर्व सभासदांनी मंजुरी दिली. यावेळी खासदार महाडिक यांनी साखरेची किमान आधारभूत किंमत 3 हजार 100 रूपया वरून 4 हजार 200 रुपये करण्यात यावी, इथेनॉलचे दर सरसकट सात रुपये प्रति लिटर प्रमाणे वाढविण्यात यावेत, सहविज निर्मिती प्रकल्पाची उत्पादन झालेली वीज खरेदी दर प्रतियुनिट वाढवून सात रुपये प्रमाणे करण्यात यावे, असे ठराव यावेळी मंजुर करण्यात आले.

Dhananjay Mahadik
Amruta Fadnavis: ''एकाला कुटुंब सांभाळायचंय तर दुसऱ्याला मुलीला मुख्यमंत्री करायचंय'' अमृता फडणवीसांचा नागपुरातून घणाघात

अडचणीत असलेल्या आजारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारने एनसीडीसीमधून अर्थसाह्य केल्याबद्दल केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा तसेच राज्य सहकारी बँकेने कारखान्याचा एकरकमी परतफेड योजनेत समावेश केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडण्यात आला. येणाऱ्या दिवाळीसाठी कामगारांना एक पगार बोनस व सभासदांना 25 किलो साखर देण्याचे यावेळी महाडिक यांनी जाहीर केले.

यावेळी अध्यक्ष विश्वराज महाडिक म्हणाले की, यंदाच्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून 125 ट्रॅक्टर, 300 डम्पिंग ट्रॅक्टर व 250 बैलगाडी अशी तोडणी वाहतूक यंत्रणे बरोबर करार करण्यात आले आहेत. गतवर्षीच्या हंगामातील शेवटच्या पंधरवड्यातील कारखान्याकडे आलेल्या उसाचे बिल देणे बाकी असून गेल्या आठवड्या पासून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलाची रक्कम जमा करण्यास सूरवात केली आहे. साखरेची एमएसपी वाढवावी, को जन प्रकल्पातील वीज खरेदी दर वाढीसाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करावा अशी मागणी अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी खासदार महाडिक यांच्याकडे यावेळी केली.

सभेचे सूत्रसंचालन शिवाजी शेंडगे यांनी केले तर आभार तात्या नागटिळक यांनी मानले. यावेळी कार्यालय अधीक्षक भाऊसाहेब जगताप, चीफ इंजिनिअर पी.सी. आसबे, शेती अधिकारी एम ए पाटील, चीफ अकौटंट नामदेव इंगळे आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.