PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

PM Modi Nashik Rally: नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
PM Modi Dindori Rally
PM Modi Dindori RallyEsakal
Updated on

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आमच्या कार्यकाळात कांदा निर्यात 35 टक्क्यांनी वाढली आहे. ऑपरेशन ग्रीनद्वारे सरकार कांदा उत्पदांना सबसीडी देत आहे.

दरम्यान या सभेत पंतप्रधानांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सभेसाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी 'कांद्यावर बोला' अशा घोषणा देण्यास सुरूवात केली.

पंतप्रधान मोदी अखेर कांद्यावर बोलताना म्हणाले, "नाशिक आणि परिसर कांदा आणि द्राक्ष शेतीसाठी ओलखला जातो. आमच्या सरकाने पहिल्यांदा कांद्याचा अतिरिक्त साठा करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही गेल्या हंगामात 7 लाख मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला आहे. आता सरकारने पुन्हा 5 लाख मेट्रिक टन कांदा साठा करण्याच्या तयारीत आहे."

"एनडीए सरकारच्या कालावधीमध्ये कांद्याची निर्यात 35 टक्क्यांनी वाढली आहे. आता दहा दिवसांपूर्वीच कांदा निर्यातीवरील बंदी हटवली आहे. गेल्या दहा दिवसांत 22 हजार पेक्षा अधिक मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे," असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

PM Modi Dindori Rally
Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना म्हणत शरद पवार व उद्धव ठाकरे यांना डिवचले. पुढे ते म्हणाले, राम मंदिराच्या उद्घाटनावर काँग्रेसने बहिष्कार टाकला यावर नकली शिवसनेने एक शब्द बोलला नाही. जी काँग्रेस वीर सावरकरांना शिव्या देत त्यांना नकली शिवसेना खांद्यावर घेऊन फिरते. नकली शिवसेनेला खूप अहंकार आहे. काँग्रेससमोर गुढगे टेकणाऱ्या नकली शिवसेनेला महाराष्ट्राने धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

PM Modi Dindori Rally
Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

दरम्यान नाशिक मतदारसंघातून शिवसेनेकडून खासदार हेमंत गोडसे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांचे आव्हान असणार आहे.

दुसरीकडे दिंडोरी मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री भारती पवार यांना मैदानात उतरवले आहे. येथे पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) भास्कर भगरे यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.