Nilesh Lanke: निलेश लंकेंची खासदारकी जाणार? विखेंच्या आव्हानानंतर हायकोर्टात सुनावणी, न्यायाधीशांनी काय दिले आदेश?

Sujay Vikhe Patil: लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंकें यांनी 624797 इतकी मते घेत विखेंचा सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला होता.
MP Nilesh Lanke And Sujay Vikhe Patil
MP Nilesh Lanke And Sujay Vikhe PatilEsakal
Updated on

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जोरदार फटका बसला. यामध्ये प्रस्थापित विखे कुटुंबही आपली जागा राखू शकले नाही. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे यांना पराभूत करत खासदार निलेश लंके जायन्ट किलर ठरले.

असे असले सुजय विखे यांनी आपला पराभव अजून मान्य केलेला नाही. कारण मतमोजणीमध्ये काही त्रुटी राहिल्याचे कारण देत त्यांनी लंकेंच्या विजयाला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली आहे.

राष्ट्रवादी फुटल्यानंतर निलेश लंके शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्याबरोबर गेले होते. मात्र, लोकसबा निवडणुकीच्या तोंड्यावर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभा लढवली आणि सुजय विखे यांचा पराभव केला.

लंके यांच्या विजयानंतर भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी याल न्यायालयात दिले आहे. विखेंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लंकेंविरुद्ध याचिका दाखल केली आहे. यावर याचिकेवर मंगळवारी (ता.6) सुनावणी पार पडली.

या सुनावणी वेळी औरंगाबाद खंडपीठाने याचिकेतील प्रतिवादी निलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

माजी खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या याचिकेत मागणी केली आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निलेश लंके निवडून आल्याचा निर्णय रद्द करावा."

MP Nilesh Lanke And Sujay Vikhe Patil
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेला अखर्चित निधीचा टेकू ! विविध विभागांचा एकूण अखर्चित निधी १,८१८ कोटी

दरम्यान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई झाली. यावेळी प्रचारात दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर जोरदार प्रहार केले होते.

यावेळी एका प्रचारसभेत सुजय विखे यांनी लंकेंना इंग्रजी बोलता येत नाही, ते संसदेत काय प्रश्न मांडणार असा सवाल केला होता. त्यानंतर लंके यांनी प्रचारात विखेंचा चांगलाच समाचार घेतला. इतकेच नव्हे तर लंके यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्त्वाची शपथही इंग्रजीमध्ये घेत विखेंना उत्तर दिले होते.

MP Nilesh Lanke And Sujay Vikhe Patil
Nana Patole : आरक्षणाचा पेच भाजपने निर्माण केला ; नाना पटोले,पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घ्यावा

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंकें यांनी 624797 इतकी मते घेत विखेंचा सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला होता. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत अहमदनगर दक्षिणची जागा लढवली होती. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.