या वादाची रेल्वे मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
सातारा : सोलापूर आणि पुणे रेल्वे विभागीय समितीच्या (Solapur-Pune Railway Divisional Committee) बैठकीत प्रत्येक प्रश्नावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून नकारात्मक उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे संतप्त झालेले नऊ खासदार बैठकीतून बाहेर पडले. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने वैतागलेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांनी विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
पुणे आणि सोलापूर विभागीय समितीची बैठक पुण्यात आयोजिली होती. या समितीत 36 खासदार आहेत. बैठकीत पूर्वी बंद केलेल्या रेल्वे सुरू करण्यात याव्यात, तसेच जे थांबे बंद आहेत, ते पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी सर्वच खासदारांनी केली आहे. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांची भूमिका कायम नकारात्मक राहिली आहे. त्यामुळे मी रेल्वेच्या विभागीय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे खासदार नाईक निंबाळकर यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम, जेऊरसारख्या भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांच्या प्रश्नावर हा वाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या वादाची रेल्वे मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यासंदर्भात खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) म्हणाले, ‘‘सोलापूर आणि पुणे विभागातील नऊ खासदार बैठकीला उपस्थित होतो. खासदारांच्या मागण्या आणि अडचणी सुचिवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून तीन आठवड्यांभरापूर्वी सांगण्यात आले होते. त्या अडचणी या बैठकीत सोडविण्याचे आश्वासन दिले होते. रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्यांच्याकडून आमच्या बहुतांश प्रश्नाला निगेटिव्ह उत्तरे दिली गेली. आमच्या पातळीवरचे हे विषय नाहीत, असे सांगून ते प्रश्न सोडविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी असमर्थतता दर्शवली. त्यामुळे बहुतांश खासदार संतप्त झाले. त्यामुळे खासदार निंबाळकर यांनी विभागीय समितीचा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली, तसेच नऊही खासदार बैठकीतून बाहेर पडले.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.