Sanjay Raut : बंडखोर आमदारांची राजकीय तिरडी उठणारच; राऊतांचा कडक शब्दात इशारा

बाळासाहेबांचा आत्मा त्यांना कधीच माफ करणार नाही.
MP Sanjay Raut criticized Shiv Sena rebel MLAs
MP Sanjay Raut criticized Shiv Sena rebel MLAsesakal
Updated on
Summary

बाळासाहेबांचा आत्मा त्यांना कधीच माफ करणार नाही.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळं शिवसेनेवर (Shiv Sena) मोठं संकट ओढावलंय. एक-एक करुन आमदार-खासदार आणि पदाधिकारी आपला राजीनामा देत आहेत. त्यामुळं शिवसेना सध्या संकटाच्या गर्तेत सापडलीय. मात्र, पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना वाचवण्यासाठी वारंवार प्रयत्न करताना दिसत आहेत.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार प्रहार केलाय. संजय राऊत म्हणाले, लोक त्यांची (एकनाथ शिंदे गट) गाढवावरुन धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांची राजकीय तिरडी उठणारच, असा कडक इशारा राऊतांनी शिंदे गटाला दिलाय. राज्यात सत्याचा खून केला जातोय. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा पुरावा देईल आणि जनता त्यांची गाढवावरुन धिंड काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बाळासाहेबांचा आत्मा त्यांना कधीच माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी बंडखोर आमदारांना दिलाय.

MP Sanjay Raut criticized Shiv Sena rebel MLAs
'आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल तर..'; मानेंविरोधात शिवसैनिक आक्रमक

शिवाय, आज पुन्हा राऊतांनी ट्विट करत शिवसैनिकांचा आत्मविश्वासही वाढवण्याचा प्रयत्न केलाय. उर्दू शायर जिगर मुरादाबादी (Jigar Moradabadi) यांची शायरी ट्विट करत संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, जो तुफानो में पलते जा रहे हैं, वहीं दुनिया बदलते जा रहे हैं!, असं त्यांनी म्हटलंय. हे ट्विट राऊतांनी आदित्य ठाकरे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे, अरविंद केजरीवाल यांना हॅशटॅग केलं. त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरुय. विशेष म्हणजे, राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हॅशटॅग केलंय, त्यामुळं उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. राऊतांचा नेमका निशाणा कोणावर याची जोरदार चर्चा रंगलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.