'त्या वक्तव्यांवर लोक हसतात, त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत'

Sharad Pawar vs Raj Thackeray
Sharad Pawar vs Raj Thackerayesakal
Updated on
Summary

'ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवत विनोदी वक्तव्य केले, मी त्या विनोदाचा आस्वाद घेतो.'

सातारा : ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवत विनोदी वक्तव्य केले, मी त्या विनोदाचा आस्वाद घेतो. अशाप्रकारची वक्तव्य केल्यास लोक हसतात. लोक अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत, अशा शब्दात खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरेंचा (Raj Thackeray) नामोल्लेख टाळून निशाणा साधला.

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर श्री. पवार यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज ठाकरे व भाजपवर (BJP) टीकेची झोड उठवली. श्री. पवार म्हणाले, ‘‘ज्यांनी मला जातीयवादी हिणवले. ज्यांनी विनोदी वक्तव्य केले, त्या विनोदाचा मी आस्वाद घेतला. अशाप्रकारची वक्तव्य केल्यास लोक हसतात. लोक अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत.’’

Sharad Pawar vs Raj Thackeray
देशासाठी कर्तव्य बजावताना जवानाचं निधन; उदयनराजेंनी व्यक्त केलं दु:ख

ओबीसी आरक्षणाविनाच (OBC Reservation) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘ओबीसी आरक्षणाचा मार्ग कसा काढायचा, यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ प्रयत्न करत आहेत. भाजपला सत्ता आपल्या हातात ठेवण्याची अस्वस्थता आहे. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळी महाविकास आघाडीवर टीका करतात.’’ भोंगा हा काय मुद्दा असू शकत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे काही नाही ते असे काही तरी बोलत असतात, असेही पवारांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar vs Raj Thackeray
राजपक्षे समर्थकाची कचऱ्याच्या गाडीतून काढली धिंड, श्रीलंकेत आंदोलन चिघळलं

देशात परिवर्तनाचे काम महाराष्ट्रातून : सुळे

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी विचारांचे आहे. छत्रपतींच्या विचारांचा कोण वारसा चालवत असेल तर तो या महाराष्ट्रातील आमच्या महिला भगिनी अन् आमचे सरपंच व ग्रामस्थ यांचा मला सार्थ अभिमान आहे. देशाला पुन्हा एकदा दाखवून देऊ सामाजिक परिवर्तनाची सुरुवात तुमच्या आमच्या महाराष्ट्रातच होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.