Viral Photos : CM शिंदेंचा नातू अन् PM मोदींमध्ये हितगूज! खासदार श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट

eknath shinde shrikant shinde rudransh shinde
eknath shinde shrikant shinde rudransh shindeesakal
Updated on

नवी दिल्लीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदी श्रीकांत शिंदे यांच्या चिमुकल्या मुलासोबतच चांगलेच रमले. यापूर्वी खासदार सुजय विखे यांच्या कन्येशी पंतप्रधानांनी गप्पागोष्टी केल्या होत्या.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी यांदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. ते म्हणतात, '' जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे, त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे.. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. जेव्हाजेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हातेव्हा ते स्वतःलाही विसरतात...''

हेही वाचाः Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

श्रीकांत शिंदे पुढे म्हणतात, ''…आजही असंच झालं! देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांची आज सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली, आणि माझा मुलगा चि.रुद्रांश सोबत मोदीजींनी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत त्याला आशीर्वाद दिले. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांनी दिलेला खाऊचा रुद्रांशने देखील हास्यमुखाने आनंदाने स्विकार केला....

...या भेटीदरम्यान प्रधानमंत्री मोदीजी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची देखील विचारपूस करित कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. यासमयी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांना श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला.''

eknath shinde shrikant shinde rudransh shinde
Winter Session 2022 : विधानभवनासमोर तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस धावले अन्यथा...

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रुद्रांश नातू मागच्या काही महिन्यांपासून चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आहे. शपथविधीसह महत्त्वाच्या कार्यक्रमांवेळी एकनाथ शिंदेंनी त्याला कडेवर घेतलं होतं. आज रुद्रांश थेट पंतप्रधानांकडे पोहोचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.