नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरेंचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरेंच्या 'त्या' कार्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक
Supriya sule- suraj mandhre
Supriya sule- suraj mandhreesakal
Updated on

नाशिक : कोरोनात (Corona) अनाथ झाल्याने ‘पोरकेपणाची सल' अनुभवणाऱ्या बालकांना शाश्वत पालकत्वाची छाया मिळावी या भावनेतून नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी दोन जुळ्या मुली दत्तक घेतल्या आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनीही कोरोनामुळे अनाथ झालेल्या ५० बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांच्या कार्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केेले आहे.

सुप्रिया सुळे ट्विटमध्ये म्हणतात,

''नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोनामुळे आई वडिलांचे छत्र हरपलेल्या जुळ्या मुलींना दत्तक घेतले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनीही कोरोनामुळे अनाथ झालेल्या ५० बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली आहे. कोरोनाच्या संकटातून देश सावरत असताना सुरज मांढरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या कृतीतून आदर्श प्रस्थापित केला आहे. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.'' असे ट्विट खा. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर केले आहे.

Supriya sule- suraj mandhre
मोदी सरकारकडून मला राष्ट्रपतीपदाची ऑफर; राज्यपालांचा गौप्यस्फोट

अनेकांनी अनुकरण करावे, असा उपक्रम

कोरोना महामारीचा अनपेक्षित धक्का प्रत्येकाला खूप काही शिकवून गेला. अनेकांना तर कायमचा पोरकं करून गेला. कधीही भरुन न येणारी ही पोरकेपणाची उणीव भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील महसूल आधिकाऱ्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांच्यासह उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी दर्जाच्या आधिकाऱ्यांनी एक व दोन पालक गमावलेल्या ५६ बालकांना दत्तक घेतले आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी दोन जुळ्या मुली दत्तक घेतल्या आहेत. त्यात, शासकीय योजनां व्यतिरिक्त संबंधित मूलांच्या अडी-अडचणींवर हे आधिकारी संबधित मूल सज्ञान होईपर्यंत कायम लक्ष ठेवून शाश्‍वत स्वरुपाची मदत करणार आहेत. इतर ठिकाणी अनेकांनी अनुकरण करावे, असा हा उपक्रम आहे.

Supriya sule- suraj mandhre
११ वर्षाच्या मुलाने केला १००० किलोमीटर प्रवास, युक्रेनमध्ये आई-वडिल अडकले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.