कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा आणि उद्योगपती मनोजकुमार जयस्वाल यांना सुनावण्यात आलेल्या चार वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. .छत्तीसगडमधील खाणवाटप प्रकरणी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ न्यायालयाने जुलैमध्ये विजय दर्डा आणि इतरांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दर्डा यांनी या निकालाला आणि सुनावण्यात आलेल्या शिक्षेला आव्हान दिले आहे. .Vijay Darda: कोळसा घोटाळ्यात काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा ठरले दोषी, दिल्ली कोर्ट या तारखेला सुनावणार शिक्षा.त्याचप्रमाणे या याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत शिक्षा स्थगित करावी, अशी विनंती करणारी याचिकाही त्यांनी सादर केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने आज त्यांची ही याचिका मान्य करत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. या सर्वांना न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडून जाण्यास परवानगी नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. जुलैत निकाल लागल्यानंतर दोनच दिवसांनी दर्डा आणि इतरांना जामीन मिळाला होता. .BJP MP: राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांचे तिकीट कापण्याची शक्यता; नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू.माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, तसेच माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दोषी ठरवले होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.