पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) होणाऱ्या परीक्षांसंदर्भात हजारो विद्यार्थ्यांचे आंदोलन बुधवारीही सुरूच होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाची दुपारी बैठक होणार असल्याचे सांगितले. मात्र आयोगाने गुरुवारी बैठक होणार असल्याचे सांगत दिवसभरात या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन कायम ठेवले.