एमपीएससीची महत्त्वाची घोषणा, परीक्षेबाबत ट्विट करुन दिली माहिती

एमपीएससीची महत्त्वाची घोषणा
MPSC
MPSCSakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आज रविवारी (ता.१७) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात महत्त्वाची घोषणा ट्विट करुन केली आहे. एमपीएससीने म्हटले आहे, की महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येतील. (MPSC Important Announcement About Gazetted Officer Exam)

MPSC
उसतोडीपेक्षा सोपी वाटली ‘एमपीएससी’ची परीक्षा मित्राच्या सल्ल्याने यशाला गवसणी घालत भुजंगची कर निरीक्षकपदी झेप

मात्र यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोरोना, मराठा आरक्षण आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे परीक्षांचे वेळापत्रक प्रत्येक वेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मानसिक ताणतणावात जगत आहेत. तसेच अनेक जण मुंबई, पुणे यासह इतर मोठ्या शहरात तयारी करित आहेत. येथील खर्च त्यांना पेलवत नाही.

MPSC
जेईई आणि खासगी महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षांना समान तारखा : विद्यार्थी अडचणीत

त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा लवकरात-लवकर घेण्याची विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.