MPSC : एसईबीसी संवर्गातील उमदेवारांच्या वयोमर्यादेत वाढ

SEBC संवर्गातील विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचाही निर्णय
Ashok Chavan
Ashok Chavan
Updated on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अर्थात MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी एसईबीसी संवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्याचा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली. (MPSC Increased age limit of SEBC candidates maharashtra gov Big decision)

चव्हाण म्हणाले, "महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी एसईबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा वयाच्या ४३ वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओपन संवर्गापेक्षा साधारण तीन वर्षांनी आपण ही वयोमर्यादा वाढवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला मान्यता दिली आहे. त्याचबरोबर SEBC संवर्गातील विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे."

अकरा महिन्यांच्या नियुक्त्या दिलेल्यांना कायम करणार

२०१४ मध्ये ESBC संवर्गांतर्गत काही उमेदवारांची निवड झाली होती. त्यानंतर उच्च न्यायलयानं स्थागिती दिल्यानंतर त्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. पण आता त्यांना नियुक्त्या देण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. यातील काही उमेदवारांना अकरा महिन्याच्या नियुक्त्या देण्यात आल्या होत्या त्यांना आता कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'त्या' उमेदवारांच्या नियुक्त्यांबाबत वरिष्ठ वकिलांचा सल्ला घेणार

तसेच SEBC संवर्गातून ज्या विद्यार्थ्यांच्या नियु्क्तीसाठी आयोगमार्फात ९ सप्टेंबर २०२० पूर्वी शिफारशी झाल्या होत्या त्यांच्या अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत, पण यावर ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी सभागृहात स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.