MPSC Exam
MPSC Examsakal

MPSC Revised Advt: समाज कल्याण विभागातील 41 पदांसाठी नवी जाहिरात; सुधारित आरक्षणासह पदसंख्येत झाला बदल; जाणून घ्या सविस्तर

MPSC Advertisement for 41 Posts of social welfare department: मराठा आरक्षणासंदर्भात लागू झालेल्या नव्या आरक्षणाच्या अनुषंगानं या सुधारित जाहिरातीत आरक्षणात आणि पदसंख्येत बदल झाले आहेत.
Published on

मुंबई : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट अ संवर्गातील ४१ पदांसाठी नवी जाहिरात राज्य लोकसेवा आयोगानं (MPSC) प्रसिद्ध केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात लागू झालेल्या नव्या आरक्षणाच्या अनुषंगानं या सुधारित जाहिरातीत आरक्षणात आणि पदसंख्येत बदल झाले आहेत. हे बदल नेमके काय आहेत? जाणून घेऊयात. (MPSC new advertisement released for 41 Posts in social welfare department)

एमीपीएससीनं काय म्हटलंय?

एमपीएससीनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, सहाय्यक आयुक्त गट अ संवर्गातील ४१ पदांसाठी १० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाची ऑनलाईन चाळणी परिक्षा घेण्यात येणार होती. दरम्यान, महाराष्ट्रात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अर्थात मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा अस्तित्वात आला. त्यामुळं मूळ जाहिरातीत बदल करुन नव्यानं सुधारित जाहिरात काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

MPSC Exam
Chhagan Bhujbal Shivena: छगन भुजबळ ठाकरेंसोबत जाणार? नेमकं काय सुरुए संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं

त्यानुसार, २७ मे २०२४ च्या आदेशानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी पदं आरक्षित करुन सुधारित मागणीपत्र पाठवलं होतं. त्यानुसार ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ४१ पदांसाठी सर्वसाधारण विविध प्रवर्गासाठी मिळून २९ जागा, महिलांसाठी ११ जागा तर खेळाडू संवर्गासाठी १ जागा तर दिव्यांगांसाठी २ पदं राखीव ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, या चाळणी परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

यामध्ये कुणबी नोंदी सापडलेल्यांसाठीचं जात प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), इतर मागासवर्ग (OBC) या संवर्गासाठी विशेष सूचना नव्या जाहिरातीत नमूद करण्यात आल्या आहेत.

MPSC Exam
Mumbai Ice Cream Case: मुंबईमधील आईस्क्रीममध्ये सापडलेलं मानवी बोट कोणाचं? पुण्याच्या कनेक्शनचा पोलिसांनी केला खुलासा

नव्यानं अर्ज कसा दाखल करायचा याचा कालावधी पुढील प्रमाणे

१) अर्ज सादर करायचा कालावधी - २० जून २०२४ रोजी दुपारी २ वाजल्यापासून ४ जुलै २०२४ रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत.

२) ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - ४ जुलै २०२४, रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत

३) एसबीआयमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी आणि चलनाची प्रत घेण्याचा दिनांक - ६ जुलै २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत

४) चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - ८ जुलै २०२४ बँकेच्या वेळेपर्यंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()