MPSC Bharti 2023: ‘एमपीएससी’तर्फे 842 पदांसाठी भरती; वैद्यकीय शिक्षणात सर्वाधिक पदे

recruitment  bharti job
recruitment bharti job
Updated on

MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध शासकीय विभागांतर्गत रिक्‍त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासंदर्भात नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्‍यानुसार विविध सात विभागांतील एकूण ८४२ जागा भरल्‍या जाणार आहेत. (MPSC Recruitment for 842 posts news )

पात्रताधारक उमेदवारांना येत्‍या १२ डिसेंबरपासून नोंदणी करता येणार असून, अंतिम मुदत १ जानेवारीपर्यंत आहे. आयोगातर्फे विविध पदांच्‍या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होऊ लागल्‍याने आता उमेदवारांत हुरूप पाहायला मिळतो. काल (ता. ५) ‘एमपीएससी’मार्फत विविध शासकीय विभागांतर्गत रिक्‍त असलेल्‍या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

त्‍यानुसार एकूण ८४२ पदांवर भरती केली जाईल. यापैकी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्‍या सर्वाधिक ७७४ जागा आहेत. उमेदवारांना त्‍यांच्‍या शैक्षणिक अर्हतेनुसार या पदांसाठी अर्ज करता येईल. येत्‍या १२ डिसेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज दाखल करता येणार आहेत. पदनिहाय परीक्षांचे स्‍वरूप, अभ्यासक्रम व परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्‍थळावरील जाहिरातीत नमूद केले.

recruitment  bharti job
Police Patil Bharti: ४७६ गावांना मिळणार पोलीस पाटील ! 'या' ५ तालुक्यांत दहा वर्षांनंतर होणार भरती

जागांचा तपशील असा ः

* वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये- ७७४

* गृह विभाग- ६

* उच्च व तंत्रशिक्षण विभाग- १

* सामान्‍य प्रशासन विभाग- १

* इतर मागास बहुजन कल्‍याण विभाग- ५७

* पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता विभाग- ३

recruitment  bharti job
IT Sector Jobs: आयटी क्षेत्रातील भरती 'थंड'! 'या' कौशल्यांची वाढली मागणी, जागतिक अस्थिरतेचा परिणाम भारतावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.