MPSC Mains result 2023: राज्यसेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल जाहीर, संकेतस्थळावर पाहता येणार

MPSC Services Mains Exam 2023: राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC
MPSC esakal
Updated on

मुंबई- राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २०, २१ व २२ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

मुख्य परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या निकालानुसार मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोगाकडून करण्यात येईल. त्या अनुषंगाने उमेदवारांना वैद्यकीय चाचणीची तारीख व ठिकाण आयोगाकडून स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

MPSC
MPSC Preliminary Exam : एमपीएससीची २१ जुलैला पूर्वपरीक्षा; शहरात ४६ केंद्रांवर १४ हजार ७८४ उमेदवारांची व्यवस्था

निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठ्यर्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलाविण्यात येणार आहे, असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.

MPSC
‘निर्णय वेगवान, गतिमान महाराष्ट्र’ कागदावरच! राज्यसेवा परीक्षा २१ जुलैला, तरी राज्य शासनाकडून ‘MPSC’ला मार्गदर्शन नाही; मागणीपत्रांअभावी 'संयुक्त पूर्व'चीही ठरेना तारीख

मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.