स्वप्निलच्या कुटुंबीयांवरील 19.96 लाखांचं कर्ज भाजपने फेडलं!

स्वप्निलच्या कुटुंबीयांवरील 19.96 लाखांचं कर्ज भाजपने फेडलं! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वतीने दिला चेक MPSC Student Swapnil Lonkar Case BJP Devendra Fadnavis clears loan on his family of 20 Lakhs
स्वप्निलच्या कुटुंबीयांवरील 19.96 लाखांचं कर्ज भाजपने फेडलं!
Updated on

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वतीने दिला चेक

मुंबई: MPSC परीक्षा पास होऊनसुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून पुण्याच्या स्वप्निल लोणकरने आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांवर 19 लाख 96 हजार 965 रूपयांचे कर्ज होते. त्या कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेत त्या रकमेचा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सुपूर्द केला. (MPSC Student Swapnil Lonkar Case BJP Devendra Fadnavis clears loan on his family of 20 Lakhs)

स्वप्निलच्या कुटुंबीयांवरील 19.96 लाखांचं कर्ज भाजपने फेडलं!
"हवं तर हेलिकॉप्टर वापरा, पण सगळ्यांना सुखरूप बाहेर काढा"

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांना हा 19 लाख 96 हजार 965 रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे या कुटुंबीयांवर कर्ज होते. ते भाजपाने फेडून टाकले.

स्वप्निलच्या कुटुंबीयांवरील 19.96 लाखांचं कर्ज भाजपने फेडलं!
राज्य सरकार आणि देशमुखांना हायकोर्टाचा दणका

आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा यामुळे हे कुटुंब त्रस्त होते. अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबीयांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.