Maratha Reservation : जरांगेंचं उपोषण स्थगित, एसटी प्रवाशांचं टेन्शन मिटणार

जरांगेंनी त्यांचं बेमुदत उपोषण स्थगित केलं असून यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
st service
st servicesakal
Updated on

राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उपोषण केलं जात होतं. यादरम्यान मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे, त्यासाठी मनोज जरांगेंनाी दोन महिन्यांचा वेळ राज्य शासनाला दिला आहे. जरांगेंनी त्यांचं बेमुदत उपोषण स्थगित केलं असून यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद राज्यभर पाहायला मिळाले होते. राज्यात अनेक ठिकाणी दगडफेग आणि जाळपोळीच्या घटना देखील पाहायला मिळाले. यानंतर आंदोलनाचा फटक एसटी महामंडळाला देकईल बसाला. बसची तोडफोड रोखण्यासाठी अनेक ठिकणी बससेवा थांबवण्यात आली होती.

st service
Maratha Reservation : जरांगेंचे उपोषण स्थगित; राज्य शासनाला आता दोन महिन्यांचा कालावधी

अनेक जिल्ह्यांमध्ये बसच्या फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला . दरम्यान लवकरच राज्यातील एसटी बससेवा पूर्वरत होईल, असं महामंडळाकडून सांगण्यात आले. तसेच महामंडळाने गुरूवारी रात्रीपासूनच इतर विभागाच्या अकडून पडलेल्या गाड्या सोडण्यास सुरूवात केली.

पुणे आगाराने मराठवाडा, विदर्भात जाणाऱ्या सर्व बस बंद केल्या होत्या. पुण्यातून जाणाऱ्या बसच्या ७८० फेऱ्या रद्द केल्या गेल्या होत्या. दरम्यान आता आंदोलन स्थगित केल्याने बस पुन्हा सुरू होणार आहे.

st service
Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्राचा विषय दोन महिन्यांमध्ये निकाली; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्‍वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.