ST News: एसटीच्या प्रत्येक आगारात होणार उत्कृष्ट कामगारांचा सन्मान

The Maharashtra State Road Transport Corporation | महत्त्वाची कामे प्रामुख्याने चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी करत असतात
ST Bus News: दोन हजार विद्यार्थी करणार ‘लालपरी’ने मोफत प्रवास!
ST Bus Newssakal
Updated on

latest Mumbai News: एसटी महामंडळाच्या २५१ आगारांमध्ये ८८ हजार पेक्षा जास्त कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. यामध्ये चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या ५ चालक, ५ वाहक, ५ यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा आगार पातळीवर १ ऑगस्टपासून दररोज गुणगौरव करण्यात येणार आहे.

प्रवाशांना प्रत्यक्ष सेवा देणे, तिकीट विक्रीतून उत्पन्न वाढविणे, इंधन बचतीतून खर्च कमी करणे आणि गाडीची सुयोग्य देखभाल ठेवून तांत्रिक दृष्ट्या निर्दोष गाडी मार्गस्थ करणे, ही महत्त्वाची कामे प्रामुख्याने चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी करत असतात. त्यांच्या कामगिरीच्या जीवावर एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे.

ST Bus News: दोन हजार विद्यार्थी करणार ‘लालपरी’ने मोफत प्रवास!
Mumbai Mounted Cops: मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच घोडेस्वार पोलीस; सरकारची मंजुरी, कुठे-कुठे घालणार गस्त?

अशा कामगारांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी आगारात दररोज उत्कृष्ट काम करणाऱ्या ५ चालक, ५ वाहक, ५ यांत्रिकी कर्मचारी यांचा सत्कार करावा, असे निर्देश सर्व आगार व्यवस्थापक यांना दिले आहे.

कर्मचारी दैनंदिन काम करताना चांगल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक झाल्यास कर्मचाऱ्यांमध्ये एक सकारात्मक संदेश जाऊ शकतो. तसेच इतर कर्मचाऱ्यांना देखील उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळू शकते, हाच उपक्रमाचा उद्देश आहे.

- डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

ST Bus News: दोन हजार विद्यार्थी करणार ‘लालपरी’ने मोफत प्रवास!
Mumbai Crime: स्टँडअप कॉमेडियन तरुणीचा 'ऑनलाईन' पाठलाग,गुन्हा दाखल; वाचा नक्की काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.