ST STRIKE : 'न्याय मागण्याचा हक्क, मात्र कुणाला वेठीस धरू नका'

एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
Anil parab-Shard Pawar
Anil parab-Shard Pawargoogle
Updated on

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) गेल्या अनेक दिवसांपासून तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आज या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी एस कर्मचारी कृती समितीची आणि अनिल परब यांची शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी अनिल परब यांनी सांगितलं की, आतापर्यंत तीन वेळा कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, न्याय हक्क मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र कुणाला वेठीस धरू नका, त्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन करतो असं परब म्हणाले.

Anil parab-Shard Pawar
शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन
Anil parab-Shard Pawar
कोरोनाचा वाढता धोका! महाराष्ट्रासह पाच राज्यांची मांडवियांसोबत बैठक

राज्य परिवहन मंडळातील २२ कर्मचारी संघटनांशी आज अनिल परब यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत चर्चा केली. परब म्हणाले की, विलीगीकऱणाच्या मुद्यावर संप सुरू आहे. मात्र या प्रकरणात एक समिती काम करत आहे. तरी देखील आम्ही दोन पावलं पुढे येण्याच्या दृष्टीने पगारवाढ दिली. ही पगारवाढ मुळ वेतनात दिली असल्याने काही कामगारांना अडचण होती. त्यांना आम्ही सांगितलं की, यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल अशा आफवा पसरवल्या जात आहेत. मात्र अशा कुठल्याही कारवाया होणार नाही. तसंच आज जे मुद्दे कृती समितीकडून मांडण्यात आले त्यात पगारवाढीतील तफावत, सातवा वेतन आयोग आणि कर्मचाऱ्यांवरील कारवाई यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं अनिल परब यांनी सांगितलं. त्यानुसार कृती समितीच्या सर्व नेत्यांनी आपल्या संपर्कातील कामगारांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं असून, आपण कामावर येऊन आपले न्याय हक्क मागा, मात्र कुणाला वेठीस धरू नका असं त्यांनी सांगितलं.

Anil parab-Shard Pawar
'सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे ST कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ'

शरद पवार यांनी यावेळी एसटी कर्मचारीच्या कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली. तर एसटी कृती समितीच्यावतीने बोलताना सांगण्यात आलं की, शरद पवारसाहेब आणि अनिल परब यांच्यात बैठक पार पडली. कृती समितीच्या वतीने आम्ही काही मुद्दे मांडले आहेत पहिल्यांदा दोन महिने संप सुरू आहे. संपाबाबत सविस्तर चर्चा झाली. सातवा वेतन आयोगासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिलंय. कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होतेय. निलंबित व बडतर्फ झालेल्यांना एसटी सुरू झाल्यावर निर्णय घेतला जाईल असं आम्हाला सांगितलंय. बांधवांनो विचार करा, विलिनीकरणाची लढाई कोर्टावर सोपवूया आणि कामावर येवूया असं आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.