"भास्कर जाधवांनी सांगितलं त्यापेक्षा खूप काही सभागृहात घडलं"

लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा विरोधकांनी अपमान केला
Ajit Pawar
Ajit PawarSAKAL
Updated on

मुंबई : महाराष्ट्राच्या सभागृहाच्या परंपरेत काल खूपच अशोभनीय प्रकार घडला. या प्रकाराचं तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी जे कथनं केलं तो यातील काही भागचं होता. त्यापेक्षा खूपच जास्त चुकीचा प्रकार सभागृहात घडला होता, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. (Much more happened in the House than Bhaskar Jadhav said says Ajit Pawar)

Ajit Pawar
काल जे घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजवणारं - उद्धव ठाकरे

अजित पवार म्हणाले, "भास्कर जाधवांनी सांगितल्याप्रमाणं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील हे मान्य केलं की आपल्याकडून बरचं काही चुकलं आहे. त्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. पण अध्यक्षांच्या दालनातील व्हिडिओ आपण पाहिला तर आपल्या सर्वांची मान शरमेनं खाली जाईल.

Ajit Pawar
'हौसले झुक ना पायेंगे...'; फडणवीसांचा सरकारला शायरीतून इशारा

कालचा घातलेला गोंधळ हा भाजपला कमी वाटला की काय आजही त्यांनी विधीमंडळाच्या दारात प्रतिविधानसभा भरवली. आम्हीही काही वेळा असे प्रकार सभागृहाच्या आतमध्ये वेलमध्ये केले आहेत. पण विरोधकांनी आज विधानसभा अध्यक्षांची परवानगी न घेता सभागृहाबाहेर माईकचा वापर केला. अशा प्रकारे विरोधीपक्षांनी लोकशाहीच्या या पवित्र मंदिराचा अपमान केला.

Ajit Pawar
सध्याच्या लहान मुलांच्या आजारपणाचा तिसऱ्या लाटेशी संबंध जोडू नका, कारण...

हे घडत असताना अपक्ष आमदार रवी राणा हे आवेशाने अध्यक्षांसमोर गेले काय? राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला काय? असा अशोभनिय प्रकारही सभागृहात घडला. आपल्या सर्वांना माहिती आहे की, संसदेत आणि विधानसभेत बेलगाम वागणाऱ्या सदस्यांवर खटला भरायला हवा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. आज कालच्या प्रकारात भर टाकायचंच काम झालं पण ते सावरण्याचा प्रयत्नही झाला नाही. रवी राणांना आज प्रश्न मांडण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करायचं होतं. पण त्याचं निलंबन न करता त्यांना बाहेर सांगायला सांगितलं, असा सर्व गोंधळ दोन दिवसीय अधिवेशनात झाला, असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.