Mukhyamantri Yojana Doot : सरकारी तिजोरीतील पैशाने होणार सत्ताधाऱ्यांचा प्रचार!कार्यकर्त्यांना महिन्याला मिळणार १० हजार?

Mukhyamantri Yojana Doot Beneficiaries : या योजनेत प्रत्येक योजनादुताला दहा हजार रूपये सहा महिन्यांसाठी शासनाच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी देणार आहेत.
Mukhyamantri Yojana Doot Latest News
Mukhyamantri Yojana Doot Latest News
Updated on

मुंबई : राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी राज्यात ५० हजार ‘मुख्यमंत्री योजनादूत’ नेमण्यात येणार आहेत. मात्र या योजना दूतांची नेमणूक, प्रक्रिया, उमेदवारांसाठी अटी याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागानेही हात झटकले आहेत. तसेच माहिती, जनसंपर्क महासंचालनालयही याबाबत गोंधळेले असल्याने या योजना दुतांच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या योजनेत प्रत्येक योजनादुताला दहा हजार रूपये सहा महिन्यांसाठी शासनाच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी देणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांची या योजनेवर सोय लावून कार्यकर्त्यांना खूष करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करणार असल्याची चर्चा रंगत आहे.

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना’ राबवण्यात येत आहे. मात्र याच योजनेचा भाग असलेल्या ५०,००० योजनादुतांच्या नेमणुकीचे संचलन माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्यावतीने केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी यांची नेमणूक कऱण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी ५००० लोकसंख्येसाठी एक व शहरी भागात ५,००० लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे एकूण ५०,००० योजनादूत या योजनेअंतर्गत नेमण्यात येणार आहेत. १८ ते ३५ वयोगटांतील राज्याचे अधिवासी पदवीधर योजनादूत पदासाठी पात्र असतील. सहा महिन्यांच्या करारावर या योजनादूतांची नेमणूक केली जाणार आहे.

Mukhyamantri Yojana Doot Latest News
Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंच्या ताफ्यावर झाली सुपारीची बरसात! बीडमध्ये मशाल अन् इंजिन आमनेसामने; पाहा Viral Video

योजनादूत आमच्या विभागाच्या योजनेचा भाग आहे. मात्र या योजनेचे संचलन करण्याचे अधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला दिले आहेत. त्यामुळे या योजनेबाबत आम्ही काही सांगू शकत नाही.

- निधी चौधरी (प्रधान सचिव, कौशल्य-रोजगार-उद्योजकता व नाविन्यता विभाग)

सरकारच्या तिजोरीत पैशांचा खडखडाट असताना नवनवीन योजना आणल्या जात आहेत. त्यात ही योजना आणली आहे. राज्यात ५० हजार योजनादूत यांची निवड करणार तीही फक्त सहा महिन्यांसाठी आणि सहा महिन्यांत ३०० कोटींचा खर्च. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार विविध घोषणांचा पाऊस पाडत आहेत. राज्यातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम हे महायुती सरकार करत आहे.

- विजय वडेट्टीवार

‘योजनादूत’बाबत ही योजना कशी राबवायची याबाबत आमचा अभ्यास सुरू आहे. या योजनेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत, अशी माहिती माहिती व जनसंपर्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलतांना दिली.

Mukhyamantri Yojana Doot Latest News
Video : बच्चन आणि गांधी आले एकत्र..! उपराष्ट्रपतींचा जया बच्चन यांच्याशी पुन्हा वाद, विरोधी पक्षाने केले वॉकआऊट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.