Korean Youtuber : कोरियन युट्यूबरचं चुंबन घेण्याचा प्रयत्न भोवणार; वांद्रे दंडाधिकाऱ्यांनी दोघांनाही...

Korean Youtuber
Korean Youtuberesakal
Updated on

मुंबईः एका कोरियन युट्यूबरचं चुंबन घेण्याचा आणि तिला गाडीवर जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना आज वांद्रे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलेलं होतं.

पीडिता ही प्रसिद्ध कोरियन युट्यूबर आहे. भारतातील विविध ठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करत असते. मुंबईमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी ती खारच्या रोड क्रमांक ५ वर आली होती. त्या ठिकाणी ती लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना ती दोन तरुणांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी या दोन तरुणांनी तिला ओढण्याचा, तिचे चुंबन घेण्याचा, तिला गाडीवर बळजबरीने बसवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं लाईव्ह सुरू होतं.

ही तरुणी घटनास्थळावरुन दूर जाऊ लागल्यानंतर तोच तरुण आपल्या एका मित्रासह बाईकवरुन पुन्हा तिच्या दिशेने आला आणि तिला जिथे जायचं आहे सोडण्याची ऑफर दिली. मात्र तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

हेही वाचाः शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

तिच्या एका फॉलोअर्सने तो व्हिडीओ मुंबई पोलिसांना ट्विट केला आणि कारवाईची मागणी केली. यानंतर तत्काळ खार पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल केली आहे. त्या तरुणीशीदेखील पोलिसांनी संपर्क साधला आहे. या प्रकरणाचे दोन आरोपी आहेत ते वांद्रे येथील आहेत. त्या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली होती.

Korean Youtuber
Gujarat Election 2022: काँग्रेसकडून भाजपला 'बाय'? भारत जोडो यात्रेला गुजरात दिसलंच नाही

दरम्यान, आज या प्रकरणामध्ये मोबीन मोहम्मद (वय १९) आणि मोहम्मद अन्सारी (वय २०) या दोन्ही आरोपींना वांद्रे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलेलं होतं. दंडाधिकारी कोर्टाने त्यांची १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल होईपर्यंत दररोज खार पोलिस ठाण्यामध्ये हजेरी लावण्याचं कोर्टाने सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.