पुणे : रविवारी मध्यरात्री एक वाजता चांदणी चौकात पूल पाडण्यात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थिती होते. स्फोट झाला, पूल पडला, राडारोडा काढण्याचं कामही सुरू झालं. पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी पुन्हा डॉ. देशमुख चांदणी चौकात काम पाहण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत हजर झाले. एकीकडं, हजारो हात रस्ता मोकळा करण्यासाठी संपूर्ण रात्र मेहनत घेत असतानाच, दुसरीकडं दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी देखील रात्रभर "फील्ड"वर हजर होते, "सर अजून घरी गेले नाहीत का ? " या प्रश्नावर देशमुख यांचं उत्तर होतं, "काम झालं की जाऊच की"!