मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खान (aryan khan) गेल्या 17 दिवसांपासून अटकेत आहे. तसेच त्याच्याकडून कारवाई दरम्यान, ड्रग्सही जप्त करण्यात आले होते. दरम्यान आर्यन खान (Aryan Khan) भवितव्याचा फैसला आज ठरणार आहे. आर्यनला जेल होणार की बेल मिळणार याबाबत आज निर्णय होणार आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (cruz drugs party) अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस (NDPS court) कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
आज होणार फैसला...
दरम्यान, गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टानं गेल्या सुनावणीत जामीन अर्जावरील निर्णय सुरक्षित ठेवला होता. एनसीबीनं 14 ऑक्टोबर रोजी विशेष एनडीपीए कोर्टात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान जामीन अर्जाला विरोध करत दावा केला आहे की, आर्यन मादक पदार्थांचं सेवन करतो. दरम्यान आज आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस (NDPS court) कोर्टात आज सुनावणी होणार आहे. एनसीबीनं त्यांना तीन ऑक्टोबर रोजी अटक केली होती.
नार्कोटिक्स ड्रग्स अॅन्ड सायकॉट्रॉपिक सब्सटेंस अॅक्ट (एनडीपीएस) प्रकरणी विशेष न्यायाधीश व्हीव्ही पाटील यांच्या न्यायालयात आर्यन खान आणि दोन इतर आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी जामीनासाठी याचिका दाखल केली होती. एनसीबीला आपली बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (एएसजी) अनिल सिंह यांनी दावा केला की, असे पुरावे आहेत की, जे दाखवताच आर्यन खान काही वर्षांपासून अमंली पदार्थांचं सेवन करत होता, हे स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.